Nashik Crime : हरीण शिकार प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा | पुढारी

Nashik Crime : हरीण शिकार प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

दरेगाव शिवारातील अमीन फार्महाउसमध्ये शिकार केलेल्या हरणांचे मांस मिळून आल्या प्रकरणी पाच जणांविरोधात पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी (दि. २३) सकाळी १२० किलो मांस, गावठी बंदूक आणि हत्यार असा दोन लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

या प्रकरणी शेख शब्बीर शेख रज्जाक ऊर्फ आला (४५, रा. कमालपुरा), शौकत हुसेन निसार अहमद (४४, रा. मोमीनपुरा) व दानिश शेख अशपाक (२२, रा. आयेशानगर) या तिघांना घटनास्थळीच पकडण्यात आले होते. हे फार्महाउस मो. आमीन मो. हारुण अन्सारी (रा. कमालपुरा) यांचे असून. हे हरण मुदस्सीर अकील अहमद (रा. बेलबाग) याने आणून दिल्याची माहिती संशयितांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button