पशुपक्ष्यांची तहान भागविण्यासाठी पुढे यावे, मठाधीपती माधवबाबा; शहरातील डॉ. आंबेडकर चौकात पाणपोईचे उद्घाटन | पुढारी

पशुपक्ष्यांची तहान भागविण्यासाठी पुढे यावे, मठाधीपती माधवबाबा; शहरातील डॉ. आंबेडकर चौकात पाणपोईचे उद्घाटन

पाथर्डी तालुका, पुढारी वृत्तसेवा: मानवासह समस्त सजीवांचे जीवनमान पाण्यावरच अवलंबून आहे. निसर्गाने सजीवाला सर्वाधिक अमूल्य भेट पाण्याच्या माध्यमातून दिली आहे. यामुळे पाण्याचा जपून वापर करावा व गरजू व्यक्तीसह पशुपक्ष्यांची तहान भागवण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन शंकर महाराज मठाचे मठाधिपती माधवबाबा यांनी केले.

शहरातील डॉ. आंबेडकर चौकात डॉ. बंडू भांडकर मित्र मंडळातर्फे पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ.बंडू भांडकर, वैभव शेवाळे, माऊली कोकाटे, बबलू वावरे, अभिजीत गुजर, सुभाष पवार, अक्षय काळे, माऊली आव्हाड, अजय भंडारी, जमीर शेख, बाबासाहेब चव्हाण, संदीप मर्दाने आदी उपस्थित होते.

माधवबाबा म्हणाले, दिवसेंदिवस निसर्गाचे संतुलन बिघडत आहे. अशात चिंतेची बाब म्हणजे भूगर्भातील पाणी पातळी खाली चालली आहे. पाणी पातळी वाढवण्यासाठी प्रत्येक मानवाने वृक्षतोड थांबवून विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करायला हवे. मानवाप्रमाने पशुपक्ष्यांसाठीही आवश्यक ठिकाणी पाणपोई उभारावी. आपल्या घरावरील छतावर पक्षांसाठी नियमित पाणी व अन्न ठेवावे, असे आवाहन माधवबाबा यांनी केले. रोहित रणखांब सूत्रसंचालन यांनी केले. नाना राऊत यांनी प्रास्ताविक केले. माऊली आव्हाड यांनी आभार मानले.

Back to top button