नाशिकच्या भद्रकाली परिसरात तीन घरांना आग | पुढारी

नाशिकच्या भद्रकाली परिसरात तीन घरांना आग

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

नाशिकच्या भद्रकाली परिसरात घरांना आग लागल्याची घटना घडली आहे. म्हसरुळ टेक येथील तीन घरांना एकाच वेळी ही आग लागली असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

म्हसरुळ टेक येथील सुरेश साळुंखे, महेश पवार, सागर पेंढारकर यांच्या घरांना आज (दि. 5) दुपारी 1 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले होते. दरम्यान आगीची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, येथील अतिक्रमण व अरुंद गल्ल्यांमुळे अग्निशमन दलाच्या वाहनांना येथे पोहचण्यास अडथळे आले.

सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसून मोठ्या शर्थींच्या प्रयत्नांनी ही आग विझवण्यात यश आले. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा : 

Back to top button