नाशिक : नांदगावला जागतिक शून्य कचरा दिन साजरा | पुढारी

नाशिक : नांदगावला जागतिक शून्य कचरा दिन साजरा

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा

नांदगाव नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२३, माझी वसुंधरा, आणि DAY-NULM यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वच्छोत्सव २०२३ आणि जागतिक शून्य कचरा दिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम मुख्याधिकारी तथा प्रशासक विवेक पं. धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली  राबविण्यात आला.

या कार्यक्रमात नांदगाव शहरातील नागरिकांना कचरा वर्गीकरण, स्वच्छतागृहाची स्वच्छता, हँडवॉश तसेच दैनंदिन निर्माण होणारा कचरा ओला व सुका कचरा, सॅनिटरी आणि घरगुती घातक कचऱ्याचे प्रकार, वेस्ट टू वेल्थ, होम कंपोस्ट, प्लास्टिक बंदी व कापडी पिशवीचा वापर याबाबत सविस्तर माहिती देऊन शहर स्वच्छतेबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्याचप्रमाणे शहरातील विविध भागात स्वच्छता मशाल जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित महिला बचत गटातील महिलांना व नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. कार्यक्रमप्रसंगी स्त्री शक्ती स्तर संघ, एकविरा वस्ती सर संघ, नांदेश्वरी वस्ती स्तर संघ, नीलंबरी वस्ती स्तर संघ, वैष्णवी वस्ती स्तर संघ, ज्ञानज्योती, निर्मिती,व सारनाथ या वस्ती स्तर संघातील बचत गटातील महिलांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्र. स्वच्छता निरीक्षक राहुल कुटे,  सिटी कॉर्डिनेटर गौरव चुंबळे, सहा. प्रकल्प अधिकारी आनंद महिरे, समूदाय संघटक विजया धनवट, क्षेत्रीय समन्वयक बिजला गंगावणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजश्री बेलदार, संगीता सोनवणे, अलका गायकवाड, रत्ना वाबळे, अलका पांडे, योगिता काळीज या स्वच्छता दूतांनी विशेष परिश्रम घेतले.

हेही वाचा:

Back to top button