जवळा : कुकडी लाभक्षेत्रात 41 टक्के पाणीसाठा | पुढारी

जवळा : कुकडी लाभक्षेत्रात 41 टक्के पाणीसाठा

जवळा; पुढारी वृत्तसेवा : कुकडी प्रकल्पातील येडगाव, पिंपळगाव जोगा, डिंबा, माणिक डोह, वडज या धरणात आजमितीला 41 टक्के इतका पाणीसाठा असल्याची माहिती जवळा (ता.पारनेर) येथील सिंचन विभागाचे कार्यकारी अधिकारी संजय बोरूडे यांनी दिली.
गतकाळात जरी पाऊस जास्त झाला असला तरी; मात्र पाणीसाठा हा 41 टक्के राहिला असल्याने पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा तालुक्यातील शेतकर्‍यांनी उन्हाळी आवर्तनासाठी आपली मागणी नोंदवावी, जेणेकरून पुढील आवर्तन योग्यवेळी सोडण्यास मदत होईल, असे अवाहन सिंचन विभागाकडून करण्यात आले.

धरणांतील पाणीसाठा
येडगाव : 67.26 टक्के – 1300 दलघफूट
माणिक डोह : 25.77 टक्के -2623 दलघफूट, वडज : 37.82 टक्के- 443 दलघफूट पिंपळगाव जोगा : 45.90 टक्के – 1789 दलघफूट
डिंभा : 49.53 टक्के – 6188 दलघफूट, एकूण कुकडी लाभक्षेत्रातील उपयुक्त पाणीसाठा 12352 दलघफूट

Back to top button