नाशिक : कपाटात ठेवलेली ३४ लाखांची रोकड केली लंपास | पुढारी

नाशिक : कपाटात ठेवलेली ३४ लाखांची रोकड केली लंपास

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा

चोरट्यांनी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या करून सुमारे ३८ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. पहिल्या घटनेत बॅग व्यावसायिकाचे घर फाेडून चाेरट्यांनी ३४ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना टाकळी राेड येथे घडली. टाकळी राेडवरील अनुसूयानगरमधील सनशाइन साेसायटीत प्रशांत नाना खडताळे यांच्या घरी घरफोडी झाली. प्रशांत खडताळे हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेलेले असताना चोरट्याने १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान घरफोडी करून घरातील कपाटात ठेवलेली ३४ लाखांची रोकड आणि ७० हजारांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या लंपास केल्या.

या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी योगेश शंकर साळी (२६, रा. कमलनगर, हिरावाडी) यांच्या घरात २० ते २१ फेब्रुवारीदरम्यान घरफोडी केली. चोरट्याने घरफोडी करून घरातील दोन लाख रुपयांची रोकड व सोने-चांदीचे दागिने असा एकूण तीन लाख ५९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button