Narpar Girna project : गिरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला : नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - पुढारी

Narpar Girna project : गिरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला : नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जळगाव ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील मोठया प्रकल्पांपैकी एक गिरणा प्रकल्प (Narpar Girna project) सलग तिसर्‍यावर्षी पूर्ण क्षमतेने भरला आहे. २९ रोजी सायंकाळी ९९ टक्के पाणीसाठा झाल्याने तसेच प्रकल्पात पाण्याची होणारी आवक पहाता गुरुवारी सकाळी ७ वाजता प्रकल्पातून ७००० क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

या प्रकल्पात पाण्याची आवक लक्षात घेता विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याचे प्रकल्प सूत्रांनी माहिती दिली. गिरणा प्रकल्पातून होणारा विसर्ग तसेच मन्याड, तितूर, बहूळा, हिवरा आदी प्रकल्पातून होणार्‍या पाण्याच्या विसर्ग केला जात आहे. त्यामुळे गिरणा नदीपात्रात पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

गिरणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचेही जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

जिल्हयातील मोठया प्रकल्पांपैकी हतनूर व वाघूर प्रकल्पातून यापूर्वीच पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

२९ सप्टेंबर रोजी रात्री गिरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने गिरणा प्रकल्पातून ५००० क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

गिरणा प्रकल्पाचे सहा दरवाजे १ फूटाने उघडले

गिरणा प्रकल्प (Narpar Girna project) यापूर्वी २०१९, २०२० व यावर्षी सलग तिसर्‍यांदा भरला असून गुरुवारी सकाळी प्रकल्पाचे सहा दरवाजे १ फूटाने उघडून ७४२८ क्यूसेकचा विसर्ग केला जात आहे.

प्रकल्पात होणारी पाण्याची आवक पहाता पाणी प्रवाहात वाढ होण्याची शक्यता असल्याचेही प्रकल्प अभियंता एस.आर.पाटील यांनी सांगितले.

जिल्हयातील मोठ्या प्रकल्पांपैकी हतनूर प्रकल्पातून वाघूर प्रकल्प देखील १०० पूर्ण भरला असून, प्रकल्पाचे दोन दरवाजे १० सेमी ने उघडून ६७४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button