Dombivli rape : अल्पवयीन मुलीवर अत्याचार म्हणजे अत्यंत घृणास्पद गुन्हा : न्यायाधीश | पुढारी

Dombivli rape : अल्पवयीन मुलीवर अत्याचार म्हणजे अत्यंत घृणास्पद गुन्हा : न्यायाधीश

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : Dombivli rape case : डोंबिवली येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेल्या २२ आरोपींना बुधवारी कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी तपासासाठी वेळ मागितला. हा गुन्हा अत्यंत अनैसर्गिक आणि घृणास्पद असल्याचे सांगत न्यायाधिशांनी आरोपींना ४ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

विशेष म्हणजे या प्रकरणात आणखी काही आरोपींची नावे पुढे येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी न्यायाधीश यांना सांगितल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.

मागील आठवड्यात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा (Dombivli rape case) अश्लील व्हिडिओ बनवत त्या व्हिडिओद्वारे ३३ जणांनी विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले होते. त्यानंतर विविध पक्षातील नेते, विविध संघटना यांनी आरोपींना शिक्षा व्हावी यसाठी मानपाडा पोलीस ठाण्याला भेट दिली होती.

इतकेच नव्हे तर पीडीतेने आपल्या जबाबात अनेक गोष्टींचा खुलासा केला असल्याचे समजत आहे. ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांच्याकडे हा तपास सोपवण्यात आला असून त्यानुसार ३३ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बुधवारी यापैकी २२ आरोपींना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते. वकील तृप्ती पाटील, सिद्धार्थ खुरांगुळे, उमर काझी यांनी आरोपीची बाजू मांडली. तर मुलीच्या बाजूने सरकारी वकील लढत आहेत.

मात्र, आणखी बराच तपास करणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी सांगितल्यामुळे न्यायाधीश एस. आर पहाडे यांनी आरोपींना पोलीस कोठडी देत हा गुन्हा अनैसर्गिक आणि घृणास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : चला सफर करूया भिवंडीच्या किल्ल्याची | World Tourism Day special | #Bhiwandifort

Back to top button