

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यापासून नीरज चोप्रा neeraj chopra सध्या चांगलाच चर्चेत आहे. जाहिरात ते मीडिया ते सोशल मीडिया असा त्याचा सातत्याने बोलबाला असतो. देशाच्या या लाडक्या हिरोचे आता जाहिराती आणि टीव्ही जगातही वर्चस्व आहे.
नीरज चोप्रा neeraj chopra अलीकडेच एका जाहिरातीत दिसला होता आणि आता तो डान्स रिॲलिटी शो 'डान्स प्लस 6' मध्ये दिसणार आहे. नीरज चोप्राने नुकतेच रेमो डिसूझाच्या शोसाठी चित्रीकरण केलं आहे.
शूटिंग दरम्यान, नीरज चोप्राने असे काही केले ज्यामुळे होस्ट राघव जुयालचे (Raghav Juyal) हृदय दुखावले. खरं तर, नीरज चोप्राने 'डान्स प्लस 6' (Dance+ 6) ची कॅप्टन शक्ती मोहनला प्रपोज केले, ज्यामुळे राघव जुयालला धक्का बसला. Dance+ 6 मध्ये राघव जुयाल आणि शक्ती मोहन एकमेकांची खेचत असतात. दोघांची बाँडिंग आणि केमिस्ट्री चांगलीच चर्चेत आहे.
निर्मात्यांनी 'डान्स प्लस 6' च्या आगामी भागाचा प्रोमो रिलीज केला आहे, ज्यात नीरज चोप्रा शोची कॅप्टन शक्ती मोहनला प्रपोज करताना दिसत आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शक्ती मोहन नीरज चोप्राला सांगते की, 'नीरज neeraj chopra एकदा स्टेजवर ये आणि दाखवून दे प्रपोज कसे करतात. हे ऐकल्यावर राघव जुयालला चांगलाच शॉक लागतो.
यानंतर, नीरज स्टेजवर पोहोचतो आणि समोर उभ्या असलेल्या शक्ती मोहनला म्हणतो की, 'भाला माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. अन्यथा, मी चांगले जेवण करू शकत नाही आणि वेळही देऊही शकत नाही.
हे ऐकून राघव जुयाल नीरज चोप्राला सांगतो, 'तू भाला चुकीच्या ठिकाणी फेकला आहेस.' हे ऐकून नीरज चोप्रा आणि इतर सगळे हसायला लागतात.
नीरज चोप्राने 'डान्स प्लस 6' मध्ये आपले नृत्य कौशल्य दाखवले. शोचे स्पर्धक आणि होस्ट राघव जुयाल सोबत नीरजने 'इश्क तडपावे' वर धमाकेदार नृत्य केले.
हे ही वाचलं का?