'दिल्ली योगशाळा' बंद करण्याच्या निर्णयाविरोधात आप आक्रमक; उपमुख्यमंत्री घेणार नायब राज्यपालांची भेट | पुढारी

'दिल्ली योगशाळा' बंद करण्याच्या निर्णयाविरोधात आप आक्रमक; उपमुख्यमंत्री घेणार नायब राज्यपालांची भेट

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्ली सरकारने राज्यात सुरू केलेल्या ‘दिल्ली योगशाळा’ कर्यक्रम बंद करण्याच्या निर्णयावर आम आदमी पक्षाने आक्षेप नोंदवला आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांनी अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. शुक्रवारी (दि.२८) ते यासंबंधी नायब राज्यपालांची भेट घेणार आहेत. नि:शुल्क योग क्लासेसची फाईल नायब राज्‍यपालांकडे आहे. तत्काळ कारवाई करण्यात आली नाही तर मंगळवारपासून क्लासेस बंद होतील. यामुळे हजारो नागरिकांचे नाहक नुकसान होईल, असे ट्विट मनीष सिसोदियांनी  केले आहे.

सरकार या कार्यक्रमाला प्रोत्साहन देवून त्याची व्याप्ती वाढवणार आहे, असे असताना संबंधित मंत्र्यासोबत चर्चा न करताच हे अभियान बंद करण्याचा निर्णय कसा घेण्यात आला? असा सवाल सिसोदियांनी उपस्थित केला. प्रशिक्षण तसेच तंत्रशिक्षण विभागाचे सचिव ऐलिस वाज यांना यासंबंधी सिसोदियांनी नोटीस बजावले असून उत्तर मागितले आहे.

दिल्लीकरांना नि:शुल्क योग प्रशिक्षण मिळावे यासाठी राज्य सरकार योग प्राशिक्षक उपलब्ध करवून देते. यानुसार राज्यात दररोज ५९० क्लासेस चालतात. यातून १७ हजार लोग योगचे प्रशिक्षण घेत आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ३१ डिसेंबर २०२१ रोजी ही योजना सुरू केली होती. दरम्यान, ३० सप्टेंबरला राज्यातील योगशाळा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा सिसोदियांनी केला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button