Nashik Trimbakeshwar : त्र्यंबकराजाला कार्तिक पौर्णिमेनंतर वज्रलेप | पुढारी

Nashik Trimbakeshwar : त्र्यंबकराजाला कार्तिक पौर्णिमेनंतर वज्रलेप

नाशिक, त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
दिवाळी सुट्ट्यांमध्ये भाविकांची गर्दी आटोपल्यानंतर वज्रलेपाचा विषय हाती घ्यावा लागणार असल्याचे त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अ‍ॅड. पंकज भुतडा यांनी स्पष्ट केले. त्यासाठी वज्रलेप कार्तिक पौर्णिमेनंतर करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

कार्तिक पौर्णिमेनिमित्त यंदा 8 नोव्हेंबरला त्रिपुरारी रथोत्सव आहे. पुरातत्त्व खात्याचे कर्मचारी आणि मंदिराचे पूजक प्रतिनिधी यांनी 17 ऑक्टोबरपासून वज्रलेप प्रकिया सुरू करण्याचे ठरवले होते. मात्र, त्यासाठी सलग तीन दिवस मंदिर भाविकांसाठी बंद ठेवावे, अशी पुरातत्त्व खात्याची मागणी होती. मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय किमान आठ दिवस अगोदर भक्तांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. बाहेरगावाहून दर्शनाच्या ओढीने निघालेले भाविक येथे आल्यानंतर निराश होतील. तसेच सध्या दिवाळीपूर्व गर्दीस प्रारंभ झाला आहे. भाविक मोठ्या संख्येने दर्शनास येत आहेत. दिवाळीनंतर 15 दिवस कार्तिक पौर्णिमा उत्सव होईल. तोपर्यंत गर्दीचा ओघ कायम राहणार आहे. या कालावधीत हजारो किलोमीटर अंतरावरून परप्रांतीय भाविकांची संख्या जास्त असते. त्यामुळे मंदिर दर्शन बंद ठेवणे योग्य होणार नाही, असे भुतडा यांनी स्पष्ट केले.

शंभर वर्षांत एकदाच वज्रलेप करावा लागतो. त्यामुळे तो काळजीपूर्वक झाला पाहिजे. त्यासाठी मंदिर बंद ठेवावे लागणार आहे. त्याची पूर्वकल्पना भाविकांना किमान आठ ते दहा दिवस मिळाली पाहिजे. त्यासाठी वज—लेप कार्तिक पौर्णिमेनंतर करण्यात येईल.
– अ‍ॅड. पंकज भुतडा, विश्वस्त, त्र्यंबकेश्वर मंदिर

हेही वाचा :

Back to top button