नाशिक : पंचवटीत चालत्या मारुती कारने घेतला अचानक पेट | पुढारी

नाशिक : पंचवटीत चालत्या मारुती कारने घेतला अचानक पेट

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा : पंचवटीतील तारवालानगर येथील सिग्नलवर धावत्या मारुती कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

याबाबत अधिक माहितीनुसार, मखमलाबाद येथील रहिवासी रामदास काकड हे मारुती कारने (एमएच 15, ईएफ 9164) पंचवटीकडून घराकडे परतत होते. दिंडोरी रोडवरील तारवालानगर सिग्नलजवळ त्यांच्या कारने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखत काकड हे कारमधून उतरले. येथील एका नागरिकाने ही बाब अग्निशामक दलाला कळविली. काही वेळातच अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले आणि लीडिंग फायरमन अर्जुन पोरजे, फायरमन नाना गांगुर्डे, शिवाजी फुगट, वाहनचालक अभिजित देशमुख यांनी आग आटोक्यात आणली. यावेळी स्टेशन ऑफिसर आर. एम. बैरागी यांनी घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा :

Back to top button