नाशिक : नंदी पाणी पितोय या चमत्‍काराची शहरभर चर्चा; भाविकांची महादेव मंदिरात दूध, पाणी पाजण्यासाठी गर्दी | पुढारी

नाशिक : नंदी पाणी पितोय या चमत्‍काराची शहरभर चर्चा; भाविकांची महादेव मंदिरात दूध, पाणी पाजण्यासाठी गर्दी

नाशिक (सुरगाणा); प्रतिनिधी येथील महादेव मंदिरातील नंदी पाणी पित असल्याची वार्ता पसरल्याने श्री स्वामी समर्थ केंद्रातील महादेव मंदिर तसेच शहरातील इतर महादेव मंदिरात मुर्तीला दूध व पाणी पाजण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली. आज (शनिवार) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जळगाव तालुक्यातील शिरसोलीत प्र.न. येथे नंदी पाणी पितोय! चमत्काराची सर्वत्र चर्चा या आशयाची पोस्ट सोशल मीडियावर फिरत होती. त्याच सोशल मीडियाच्या पोस्टचा आधार घेत येथील महादेव मंदिरातील नंदी पाणी पीत असल्याची अफवा पसरताच ही वार्ता शहरभर पसरली.

यामुळे नंदीला दूध व पाणी पाजण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये विशेषतः महिला वर्गाचा समावेश होता. हा प्रकार श्रद्धेचा किंवा अंधश्रद्धेचा असू शकतो. तर हा चमत्कार असल्याचीही चर्चा सुरू होती. मात्र पाण्याचा चमच्या नंदीच्या तोंडाला लावला असता पाणी खाली न सांडता पाणी व दूध मुर्ती कडून प्यायले जात होते. अशी अफवा पसरल्याने नंदीला पाणी पाजण्यासाठी भाविक महिला व पुरषांसह बालगोपाळांची गर्दी झाली होती.

नंदी पाणी पितोय या सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या पोस्ट मुळे येथील महादेव मंदिरात महिलांची गर्दी झाल्याचे दिसून आले. सदर घटना हि श्रद्धेशी निगडित असून, नेमकी श्रद्धा व अंधश्रद्धा हे समजून घेणे आवश्यक आहे. सोशल मीडिया हे समाज माध्यम असल्याने त्याचा वापर समजपुर्वक करावा. सध्या उन्हाती तिव्रता वाढल्याने पाषाण अथवा धातूच्या मूर्ती शुष्क व कोरड्या झाल्याने त्यामधील केषाकर्षण वाढले आहे. त्यामुळे द्रव पदार्थ शोषले जातात. सदर घटनेला कोणत्याही प्रकारचा वैज्ञानिक आधार नसून अशा घटनांकडे भाविकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच बघितले पाहिजे. अंधश्रद्धेला बळी न पडता अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.

रतन चौधरी, प्राथमिक शिक्षक तथा नाशिक जिल्हा अध्यक्ष – आदिवासी ट्रायबल फोरम 

१९९५ साली गणेशोत्‍सवानंतर अचानक देशाच्या कानाकोपऱ्यातील गणपतीच्या मूर्ती दूध पित असल्‍याची अफवा पसरली होती. ही अफवा वाऱ्यासारखी पसरली. मात्र ती कोठून पसरली माहित नाही, मात्र बघता बघता देशाच्या कानाकोपऱ्यातील गणेश मंदिरात तसेच घरातील गणेशाच्या मूर्तीला दूध पाजण्यासाठी भक्‍तांची झुंबड उडाली. यावेळी या प्रकाराला कोणताही वैज्ञानिक पुरावा नसल्‍याने हा प्रकार एक – दोन दिवसात बंद झाला.

Back to top button