Shahrukh : 'पठाण'चा नवा लूक, ड्रायव्हरला मारली मिठी अन्... (video) | पुढारी

Shahrukh : 'पठाण'चा नवा लूक, ड्रायव्हरला मारली मिठी अन्... (video)

पुढारी ऑनलाईन; बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान ( Shahrukh Khan ) तब्बल चार वर्षांच्या ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर आगामी ‘पठाण’ चित्रपटातून पदार्पण करत आहे.   या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. याच दरम्यान शाहरुख खान मुंबईच्या विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी त्याने चक्क ड्रायव्हरला मिठी मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

शाहरुख खानसह ( Shahrukh Khan ) ‘पठाण’ चित्रपटातील सर्व कालाकार शूटिंगसाठी सध्या स्पेनला रवाना होत आहेत. याच दरम्यान बॉलिवूड किंग खान मुंबई विमानतळावर स्पेनला जात असताना स्पॉट झाला. यावेळी शाहरूख पोनीटेलसोबत स्काई ब्लू लॉन्ग टेलर जॅकेट आणि नेवी ब्लू जीन्समध्ये दिसला. एअरपोर्टवर जात असताना पहिल्यांदा शाहरूखने आपल्या ड्रायव्हरला मिठी मारली आणि हस्त आंदोलन केले. यावेळी पापाराझींच्या कॅमेऱ्याची नजर त्याच्यावर पडली.

याच दरम्यान त्याने पापाराझींच्या कॅमेऱ्यासमोर पोझ देण्यास थांबला नसल्याचेही निदर्शनास आले. परंतु, एअरपोर्टवरील एन्ट्री गेटवर CISF जवानाने त्याला थोडे थांबण्यास सांगितले. यानंतर शाहरूखने त्याचे हात जोडून आभार मानत आत प्रवेश केला. या घटनेचा एक व्हिडिओ विरल भयानी इंन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेंन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने ‘त्याच्या एका झलकमुळे आमचा दिवस चांगला जातो.’ तर दुसऱ्या एका युजर्सने शाहरूखने चक्क ड्रायव्हरला मिठी मारली हे पाहून माझे हृदय भरून आले आहे. त्याच्यासाटी मी सदैव प्रार्थना करत राहिन एसआरकेसाठी’. असे म्हटले आहे. तिसऱ्या एका युजर्सने ‘ज्या ऑफिसरने शाहरूखला गेटवर तपासले नाही तो खरंच भाग्यवान आहे. तो हिरा आहे.’ असे म्हटले आहे. याशिवाय काही चाहत्यांनी फायरचा ईमोजी शेअर केले आहे.

‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताकदिनी रिलीज होणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या भूमिका आहेत.

हेही वाचलंत का? 

(video : viralbhayani instagram वरून साभार)

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button