जळगाव : कौटुंबिक वादातून दोन चिमुकल्यांसह वडिलांची धावत्या रेल्वेसमोर उडी घेवून आत्महत्या | पुढारी

जळगाव : कौटुंबिक वादातून दोन चिमुकल्यांसह वडिलांची धावत्या रेल्वेसमोर उडी घेवून आत्महत्या

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील २७ वर्षीय तरुणाने कौटुंबिक वादातून आपल्या दोन चिमुकल्यांसह धावत्या रेल्वेसमोर उडी घेवून आत्महत्या केली. ही धक्‍कादायक घटना नगरदेवळा रेल्वेस्थानक परिसरात घडली.जितेंद्र दिलीप जाधव ( रा. बोरखेडा ता. चाळीसगाव) असे वडिलाचे नाव असून, चिराग ( वय ६ ) व खुशी ( ४ ) अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील जितेंद्र जाधव हा पत्नी आणि दोन मुलांसह राहत हाेते.  चाळीसगाव येथे जेसीबी चालक म्हणून ते काम करत होते. जितेंद्र जाधव आणि त्यांची पत्नी यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. जितेंद्र व त्‍यांची पत्नी यांच्यात कौटुंबिक वाद सुरुच हाेते. पत्नीने तिचा भाऊ भूषण, काका सुधाकर व काकु यांना चाळीसगाव येथे बोलावून घेतले. ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये जितेंद्र याच्‍याविराेधात विरुद्ध तक्रार दाखल केली होती.

पत्नी ही भाऊ, काका आणि काकूसोबत माहेरी निघून गेली. त्‍यांनंतर जितेंद्र दोन मुलांना सोबत घेऊन आपल्या मूळगावी आला होता. दरम्यान, रविवार जितेंद्रने चिराग व खुशी दोन्ही मुलांना सोबत घेतले. बोरखेडा येथील बसस्थानकावरील हॉटेलवर त्याने दोघा मुलांना पाववडे खाऊ घातले. त्यानंतर ते अचानक दिसेनासे झाल्‍याने जितेंद्र याचा भाऊ व वडिलांनी शोध घेणे सुरू केले. नगरदेवळा रेल्वेस्थानका जवळ त्यांचे नातेवाईक नाना अहिरे यांना शोध घेत असताना जितेंद्र, चिराग व खुशी हे तिघेही मृत आढळून आले.

धावत्या रेल्वेखाली घेतली उडी

सकाळी ११ वाजता धावत्या सचखंड एक्सप्रेस समोर जितेंद्रने दोन्ही चिमुकल्यासमवेत उडी घेवून आत्महत्या केली. घटनेची माहिती पाचोरा येथील रेल्वे स्थानकावरील पोलिसांना मिळताच पोलीसांनी पंचनामा केला. याप्रकरणी रेल्वे पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचलं का ? 

Back to top button