नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशात सलग सात दिवसानंतर 'कोरोनामुक्तां'पेक्षा नवे रुग्ण अधिक आढळले. 'कोरोनामुक्तां'पेक्षा नवे रुग्ण अधिक आढळल्याने आरोग्य विभागाची चिंता कायम आहे.
अधिक वाचा
मागील २४ तासांमध्ये ४१ हजार ८०६ नवे रुग्ण आढळले. ३९ हजार १३० जणांनी कोरानावर मात केली. तर ५८१ जणांचा
मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.
मंगळवारी मागील चार महिन्यांतील सर्वात कमी म्हणजे, ३१ हजार ४४३ नवे रुग्ण आढळले होते. मात्र दुसर्या दिवशी बुधवारी ३८ हजार ७९२ नवे रुग्ण आढळले.
अधिक वाचा
रुग्णवाढीमुळे कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यापूर्वीच तिसरी लाट येण्याची शक्यता बळावली आहे.
देशभरात सध्या ४ लाखा ३२ हजार ०४१ रुग्ण सक्रीय आहेत. आतापर्यंत ३ कोटी ९ लाख ८७ हजार ८८० जणांना कोरोनाची बाधा झाली. ३ कोटी २ लाख ४३ हजार ८५० जणांनी कोरोनावर मात केली. सध्या ४ लाख ३२ हजार ०४१
रुग्णांवर उपचार सूरु आहेत. आतापर्यंत ३९ कोटी १३ लाख ४० हजार ४९१ जणांचे लसीकरण झाले आहे.
देशात सध्या रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९७.२८ इतकी झाली आहे. तर सक्रीय रुग्ण १.३९ टक्के आहेत.
आठवड्याचा संसर्ग दर हा ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर दैनंदिन संसर्ग दर २.१५ टक्के आहे. गेली २४ दिवस हा दर तीन टक्क्यांपेक्षा कमी रहिला आहे. आतापर्यंत ४३.८० कोटी नागरिकांची कोरोना चाचणी झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.
हेही वाचलं का?