शरद पवार गटाच्या चार खासदारांना अपात्र करा : तटकरे | पुढारी

शरद पवार गटाच्या चार खासदारांना अपात्र करा : तटकरे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांना अपात्र करण्याबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना स्मरण करून दिल्यानंतर तटकरे यांनीही आमच्या पत्रानुसार त्या गटाचे खासदार श्रीनिवास पाटील, महमद फैजल, वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांना लोकसभा अध्यक्षांनी अपात्र करावे, असा पलटवार केला आहे.

राष्ट्रवादी भवनमध्ये शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत तटकरे म्हणाले, आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी खासदार पाटील, फैजल यांच्या अपात्रतेसाठी ओम बिर्ला, तर प्रफुल्ल पटेल यांनी वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल त्यांना अपात्र करण्यासाठी राज्यसभा सभापतींना पत्र दिले आहे.

Back to top button