ASHA workers: मोठी बातमी : ‘आशा सेविकांसाठी’ राज्य सरकारकडून दिवाळी भेट; मानधनात भरघोस वाढ | पुढारी

ASHA workers: मोठी बातमी : 'आशा सेविकांसाठी' राज्य सरकारकडून दिवाळी भेट; मानधनात भरघोस वाढ

पुढारी ऑनलाईन : राज्यातील आशा स्वयंसेविकांच्या मानधनात २ हजार रूपयांची भरघोस वाढ करण्यात आली आहे. या संदर्भातील घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे. त्यामुळे राज्यातील आशा सेविकांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. या संदर्भातील माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी त्यांच्या अधिकृत X सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. (ASHA workers)

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या ८० हजारांपेक्षा अधिक आशा स्वयंसेविकांना ७ हजार रुपये तर ३६६४ गट प्रवर्तकांना प्रत्येकी ६ हजार २०० रूपयांची घसघशीत मानधन वाढ आणि त्याचबरोबर त्यांना प्रत्येकी २ हजार रुपयांची दिवाळी भेट देण्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज (दि.२) मुंबई येथे केली. आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई कार्यालयात आशा स्वयंसेविका, संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासोबत आयोजित बैठकीत आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी ही घोषणा केली. (ASHA workers)

सन २००७ पासून राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत ‘आशा सेविका’ योजनेची अंमलबजावणी होत आहे. सद्यस्थितीत राज्यात ८० हजारांपेक्षा अधिक आशा सेविका कार्यरत आहेत. आतापर्यंत या आशा सेविकांना 5000 रुपये प्रतिमाह मानधन देण्यात येत होते. दरम्यान राज्य सरकारकडून त्यांच्या मानधनात २ हजार रूपयांची वाढ करण्यात आली असून, राज्यातील आशा सेविकांना आता ७ हजार रूपये मानधन मिळणार आहे. (ASHA workers)

हेही वाचा:

Back to top button