Israel-hamas war : इस्रायलला धडा शिकवला पाहिजे; हमासच्या अधिकाऱ्याने घेतली शपथ | पुढारी

Israel-hamas war : इस्रायलला धडा शिकवला पाहिजे; हमासच्या अधिकाऱ्याने घेतली शपथ

पुढारी ऑनलाईन डेस्क :  हमासच्या एका नेत्याचे वक्तव्य सध्या चर्चेत आहे. त्याच्या वक्तव्याने जगभरात खळबळ उडाली आहे. ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये केलेल्या हल्ल्याचे स्वागत करत म्हटलं आहे की, “जर संधी मिळाली तर, इस्रायलचा नाश होईपर्यंत दहशतवादी गट भविष्यात अशाच प्रकारच्या हल्ल्यांची पुनरावृत्ती करेल” य़ा वक्तव्याने शक्यता वर्तवली जात आहे की, या युध्दाची तीव्रता वाढू शकते.  (Israel-Hamas war)

Israel-Hamas war : इस्रायलला धडा शिकवला पाहिजे 

गेले काही दिवस इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबत नाही आहे. दिवसेंदिवस ते चिघळतच आहे. हजारो लोक यात मारली गेली आणि जखमी झाली आहेत. या युध्दाचे पडसाद जगभर उमटत आहेत. टाइम्स ऑफ इस्रायलने  दिलेल्या वृत्तानुसार,  हमासच्या नेता गाझी हमाद याने लेबनीज टेलिव्हिजन चॅनेल एलबीसीला मुलाखत दिली आहे. नंतर ही मुलाखत मिडल ईस्ट मीडिया रिसर्च इन्स्टिट्यूट (एमईएमआरआय) द्वारे बुधवारी (दि.१) भाषांतरित आणि प्रकाशित केली गेली आहे.

या मुलाखतीत म्हटलं आहे की, “इस्रायल हा असा देश असा आहे ज्याला आमच्या भूमीवर जागा नाही. आम्ही त्यांना हटवले पाहिजे कारण ते अरब आणि इस्लामिक राष्ट्रांसाठी सुरक्षा, लष्करी आणि राजकीय आपत्ती निर्माण करतात. हे सांगायला आम्हाला लाज वाटत नाही,” बोलताना पुढे असेही म्हटलं आहे की, ” इस्रायलला धडा शिकवला पाहिजे आणि आम्ही ते दोनदा- तीनदाही करू शकतो. अल-अक्सा महापूर (हमासने ७ ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्याचे नाव) ही पहिलीच वेळ आहे. आम्हाला  या युध्दाची किंमत मोजावी लागेल. तर होय, आणि आम्ही ती द्यायला तयार आहोत. आम्हाला शहीदांचे राष्ट्र म्हटले जाते आणि आम्हाला शहीदांचे बलिदान देण्याचा अभिमान आहे, आम्ही नागरिकांना इजा पोहोचवू इच्छित नाही. हा कब्जा केवळ गाझामध्येच नाही तर संपूर्ण पॅलेस्टाईनच्या भूमीवर संपला पाहिजे.

 

हेही वाचा 

Back to top button