Raj Thackeray : राज ठाकरे यांच्याकडून 'त्या' मनसैनिकांचे अभिनंदन | पुढारी

Raj Thackeray : राज ठाकरे यांच्याकडून 'त्या' मनसैनिकांचे अभिनंदन

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईत मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. यानंतर इतरांनी निषेध व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला. हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत,” असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या : 

राज ठाकरे यांनी ट्विटरवर लिहीले की, “मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे. काल मुलुंडमध्ये महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झाला तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे.”

हेही वाचा : 

Back to top button