''मी दरवेळी येणार आणि तुम्ही....'' , राज ठाकरे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना झापलं | पुढारी

''मी दरवेळी येणार आणि तुम्ही....'' , राज ठाकरे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना झापलं

पुढारी ऑनलाईन: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसीय पुणे दौर्‍यावर असून बुधवार २१ जून रोजी त्यांनी नवी पेठेतील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयास भेट दिली. त्यावेळी शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. राज ठाकरे यांची गाडी कार्यालयाजवळ येताच कार्यकर्त्यांनी फटाक्याची मोठी माळ लावली. यामुळे राज ठाकरे यांना पाच मिनिटे गाडीतच बसून राहावं लागलं. ते गाडीतून उतरताच ” कशासाठी हे फटाके वाजविले ? मी दरवेळी येणार आणि तुम्ही फटाके वाजवणार ” अशा शब्दांत ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना झापलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसीय पुणे दौर्‍यावर आहेत. या दरम्यान नवी पेठेतील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयास त्यांनी भेट दिली. यावेळी पुणे शहरातील कार्यकर्त्यांसह, नाशिक येथील पदाधिकाऱ्यांसोबतच शेतकरी देखील उपस्थित होते. बुधवारी होणाऱ्या बैठकीत शेती विषयावर चर्चा होणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि अडचणी राज ठाकरे हे समजून घेणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा करणार असल्याची माहिती मनसेच्या नेत्यांनी दिली.

हेही वाचा:

पुण्यात वाहने फोडून दहशत माजविणारी पप्पुल्या टोळी जेरबंद

पुणे: चोरलेल्या २१ मोटार सायकलींसह तिघे जेरबंद अटक, इंदापूर पोलिस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कामगिरी

पुणे : वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची दमछाक ; आठवडे बाजारामुळे अडथळा

 

Back to top button