Atul Benke: शरद पवार शेरकरांच्या घरी जाणार, याचा वेगळा अर्थ काढू नये : आ. अतुल बेनके | पुढारी

Atul Benke: शरद पवार शेरकरांच्या घरी जाणार, याचा वेगळा अर्थ काढू नये : आ. अतुल बेनके

ओझर: पुढारी वृत्तसेवा : सत्यशील शेरकर आणि मी सोबत आहे, त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार शेरकर यांच्या घरी प्रथम गेले. तर त्याचा अर्थ कुणी वेगळा काढू नये. मी आजही आणि उद्याही पवार कुटुंबाबरोबरच आहे, असे  राष्ट्रवादी काँग्रेसचे  जुन्नरचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी ‘पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेचे नेते शरद पवार १ ऑक्टोबरला जुन्नर येथे बिरसा ब्रिगेडच्या वतीने आयोजित मेळाव्याला येणार आहेत. जुन्नर येथे मंडपाची पाहणी आमदार अतुल बेनके यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार आदी उपस्थित होते. (Atul Benke)

शरद पवार यांच्या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने मांडव कमी पडता कामा नये, अशा प्रकारच्या सूचना यावेळी बेनके यांनी दिल्या. शरद पवार हेलिकॉप्टरने येणार असून हेलिपॅड विघ्नहर सहकारी साखर कारखान्याजवळ करण्यात आले आहे. त्यांच्या स्वागताला त्या ठिकाणी मी असणार आहे. तसेच प्रथम ते विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. यावेळी मी पण सोबत असणार आहे. त्यानंतर शरद पवार नारायणगाव येथील माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. त्यानंतर ते जुन्नरला सभेसाठी रवाना होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच जुन्नर तालुक्यात येत असल्यामुळे सगळ्यांचीच उत्कंठा वाढलेली आहे.

हेही वाचा 

Back to top button