ड्रग्ज प्रकरणात वानखेडे यांच्या मेहुणीची एंट्री; मलिक यांच्या टि्‌वटनंतर... | पुढारी

ड्रग्ज प्रकरणात वानखेडे यांच्या मेहुणीची एंट्री; मलिक यांच्या टि्‌वटनंतर...

मुंबई, पुढारी ऑनलाईन

एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यातील लढाई अधिक टोकदार होत असताना आता वानखेडे यांच्या मेहुणीचीही या वादात एंट्री झाली आहे.

मलिक यांनी टि्‌वट करून वानखेडे यांची मेहुणी ड्रग्ज प्रकरणात असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल असल्याची माहिती दिली. यावर वानखेडे यांनी ‘खूप छान, एका महिलेचे नाव सार्वजनिक केल्याबद्दल धन्यवाद’ अशी उपहासात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

मलिक यांनी केलेल्या आरोपाबाबत बोलताना वानखेडे यांनी हे प्रकरण २००८ मधील आहे. माझे आणि क्रांती रेडकर यांचे लग्न २०१७ मध्ये झाले. क्रांतीच्या बहिणीवर गुन्हा दाखल झाला तेव्हा मी नोकरीतही नव्हतो. क्रांतीची बहीण हर्षदा हिच्यावर गुन्हा दाखल झाला तेव्हा मी नोकरीत नव्हतो. मग माझा या केसशी काय संबंध? असा सवाल केला आहे.

एका महिलेचे नाव सार्वजनिक केल्याबद्दल धन्यवाद…. असे म्हणत उपहासात्मक उत्तर दिले आहे. आम्ही प्रेसनोट पाठविताना खूप काळजी घेत होतो.त्यात त्या महिलेचे नाव येणार नाही याबाबत दक्षता घेतो. आम्ही त्यांचा सन्मान करतो. पण नवाब मलिक यांनी अशा एका महिलेचे नाव सार्वजकि केले, जिचे कुटुंब आहे, मुले आहेत.’

मलिक यांनी पुरावे दिले

नवाब मलिक यांनी सोमवारी सकाळी ट्विटरवर एक स्क्रीन शॉट शेअर केला. त्यात पुणे कोर्टात प्रलंबित असलेल्या ड्रग प्रकरणाचा उल्लेख होता. त्यातून त्यांनी वानखेडे यांच्यावर निशाना साधला. ‘समीर वानखेडे यांची मेहुणी हर्षिदा दीनानाथ रेडकर ड्रग्ज व्यापारात सहभागी आहे? समीर वानखेडे यांना उत्तर द्यावे लागेल.’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

पुरावे आहेत तर कोर्टात जा

एनसीबीने नवाब मलिक यांना उत्तर दिले असून जर मलिक यांच्याकडे पुरावे आहेत तर त्यांनी कोर्टात जावे. वानखेडे यांनी मालदीवमध्ये गेल्यानंतर भाजप नेता मोहित कांबोज यांच्याशी संपर्क केल्याचा आरोप झाल्यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी प्रत्युत्तर दिले.

समीर वानखेडेच्या प्रायव्हेट आर्मीकडून मोठ्या प्रमाणात वसुली

समीर वानखेडे जेव्हापासून एनसीबी विभागात आला तेव्हापासून वानखेडेने आपली प्रायव्हेट आर्मी बनवली. त्यात किरण गोसावी, मनिष भानुषाली, फ्लेचर पटेल, आदिल उस्मानी, सॅम डिसूजा, इलू पठाण हे त्यात होते. ही प्रायव्हेट आर्मी मुंबईत ड्रग्जचा व्यवसाय देखील करते. नावासाठी केवळ छोट्या – छोट्या लोकांना पकडून कारवाई दाखवली जाते. तसेच वानखेडेच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली गोळा केली गेली. प्रभाकर साईलने सांगितल्याप्रमाणे आर्यन खान प्रकरणात १८ कोटींची वसुली मागितली गेली. सॅम डिसूजा देखील समोर आला असून त्यात त्याने पैसे मागितल्याबद्दल कबुली दिली आहे. मात्र एनसीबीचा यात हात नसल्याचे त्याने म्हटले असले तरी अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात. किरण गोसावी कारवाईच्या ठिकाणी काय करत होता. १३ लोकांचे फोटो सर्व लोकांना आधीच कसे दिले होते? १५ दिवसांपासून प्लॅनिंग कशी चालू होती? हे प्रकरण पुर्ण फर्जीवाडा असून समीर वानखेडेंनी ते रचले होते, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. पहिल्या दिवसापासून मी या प्रकरणातील अनेक बाबी समोर आणल्या. मात्र ‘सत्यमेव जयते’ चा मुखवटा धारण करुन हे लोक प्रकरण दाबत होते असेही नवाब मलिक म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button