Pooja Sawant : सुंदर…सोज्वळ…मराठमोळं..सौंदर्य

Pooja Sawant : सुंदर…सोज्वळ…मराठमोळं..सौंदर्य
Published on
Updated on

पूजा सावंतने नवे फोटोशूट आणि नवे व्हिडिओज शेअर केले आहेत. ♥️Stand by me ♥️ अशी कॅप्शन देत तिने लाल रंगाच्या सुंदर साडीत व्हिडिओ केला आहे. तर शुभ दीपावली ? ✨ म्हणत तिने फोटोज शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने बॉटल ग्रीन कलरची साडी परिधान केलीय. त्यावर केसंचा अंबाडा घालत केसात गजराही माळला आहे. तिने हे फोटोशूट एखा दागिन्यांच्या जाहिरातीसाठी केली आहे. बॉटल ग्रीन रंगाच्या साडीवर दागिने घालून तिने ही जाहिरात केलीय. या व्हिडिओला तिने You can never get enough of your favourite song ? ? अशी कॅप्शन लिहिलीय.

तिच्या या फोटोला चाहत्यांनी भरभरून कमेंट्स दिल्य़ा आहेत. मराठी अप्सरा, सुंदर…सोज्वळ…मराठमोळं..सौंदर्य ❤️❤️❤️❤️ , किती छान दिसतेस, माहोल गरम ?? अशीही कमेंट देऊन चाहत्यांनी तिचे कौतु केलं आहे.

या साडीतील लूकमध्ये पूजा खरचं खूप सुंदर दिसतेय.

'दगडी चाळ' या चित्रपटातीलं 'मन धागा धागा जोडते नवा' हे तिच्यावर चित्रीत करण्यात आलेलं गाणं लोकप्रिय ठरलं. या गाण्‍यातली ती खूप सुंदर दिसली होती. पूजाच्या चेहऱ्यावर डोळ्‍यांसमोर आलेल्‍या तिच्या केसांच्या बटांनी सर्वांचचं लक्ष वेधून घेतलं.

तिचा 'लपाछपी' हा चित्रपटही चांगला गाजला होता. तिच्‍या अभिनयाचे कौतुक, चित्रपटातील तिच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कारानेदेखील घेतली.

दगडी चाळ, नीळकंठ मास्तर, सतरंगी रे अशा अनेक मराठी चित्रपटांतून झळकलेल्या पूजाने अनेक वेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत.

बस स्टॉप, झकास, आता गं बया असे चिज्ञपट करून तिने अगदी कमी कालावधीत सिनेसृष्टीत आपले बस्तान बसवले. क्षणभर विश्रांती (२०१०) या चित्रपटातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता.

बॉलिवूडमध्येही तिने नशीब आजमावले. अभिनेता विद्युत जामवालसोबत तिने जंगली या चित्रपटात काम केलं आहे.असंख्य अभिनेत्रींबरोबर पूजाही आघाडीची अभिनेत्री बनली. सौंदर्याबरोबरचं अभिनयाच्या कौशल्यावर तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

पूजाचा जन्म मुंबईमध्ये २५ जानेवारी, १९९० मध्ये झाला होता. तिचे शालेय मुंबईतील बालमोहन विद्यामंदिरातून पूर्ण केले. पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईमध्ये कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्समधून केले. डान्स रिॲलिटी शो 'बूगी-वूगी'मधून तिने मायानगरीत पाऊल ठेवलं, पुढे ती एका मराठी डान्स शोमध्येही दिसली.

मुंबईची राहणाऱ्या पूजा काही वर्षापूर्वी 'कॅलेंडर गर्ल' म्हणून चर्चेत आली होती. सिनेविश्वात ग्लॅमरस मराठी अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. पूजाला बालपणापासून अभिनय आणि नृत्याची आवड होती. तिने आपल्या महाविद्यालयीन काळात विविध नृत्याच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. महाविद्यालयात असताना ती व्हॉलीबॉल खिळाडूदेखील होती.

पूजा सावंतने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात २०१० मध्ये सचित पाटील यांचा चित्रपट 'क्षणभर विश्रांती'मधून केली होती. त्यानंतर ती अंकुश चौधरीसोबत मराठी चित्रपट "झकास"मध्ये दिसली होती. बॉलिवूड चित्रपट 'जंगली' (२०१९) मधून तिने विद्युत जामवालसोबत बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news