धनंजय मुंडे म्‍हणाले, चंद्रकांत पाटलांचे खिसे एवढे मोठे नाहीत | पुढारी

धनंजय मुंडे म्‍हणाले, चंद्रकांत पाटलांचे खिसे एवढे मोठे नाहीत

मुंबई, पुढारी ऑनलाईन : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर त्याला अटक केलेल्या एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि भाजपवर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी टीकेचा भडीमार केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, “नवाब मलिकांसारखे लोक मी खिशात ठेवतो.” आता त्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि मत्री धनंजय मुंडे यांनी “चंद्रकांत पाटलांना ही भाषा शोभत नाही”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.बीडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे बोलत होते.

या वेळी धनंजय मुंडे म्हणाले की, “चंद्रकांत पाटलांना अशी भाषा शोभत नाही. चंद्रकांत पाटलांचे खिसे एवढे मोठे नाहीत किंवा भाजपाच्या कुठल्याच राज्य किंवा केंद्रातील नेत्यांचे खिसे मोठे नाहीत. ज्यांनी त्यांनी आपली मर्यादा ठेवून बोलायला पाहिजे”.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते? 

“मला एक सामान्य नागरिक म्हणून प्रश्न पडला आहे की, एवढा यांना शाहरूख खानच्या मुलाचा पुळका का आला? म्हणजे नवाब मलिक रोज काहीतरी म्हणणार, मग महाराष्ट्र सरकार आता काय सर्वोच्च न्यायालयात जाणार. महाराष्ट्रात दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यात महाराष्ट्र सरकार तत्परता दाखवत नाही, अशी खोचक प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.

नवाब मलिकांची भाजपवर सडकून टीका

“भाजपाचे मोठमोठे नेते, त्यांच्याजवळचे लोकं एनसीबीच्या कार्यालयात जातात. ते एनसीबी अधिकाऱ्यांना भेटत आहेत. काही भाजपाचे नेते यांचे राईट हँड समीर वानखेडेला भेटत आहेत, हे मी जबाबदारीने सांगतोय. या हालचाली वाढल्या आहेत. पोपट पिंजऱ्यात गेला तर आणखी अनेक गुपितं बाहेर येतील म्हणून जीन असलेले भाजपाचे लोक घाबरायला लागले आहेत. हिवाळी अधिवेशनात मोठमोठे नावं समोर येणार आहेत. के. पी. गोसावी, भाजपाचा एक नेता, त्याच पत्नी एका खासगी कंपनीत संचालक आहेत. विधानभवनाच्या पटलावर मी हे सर्व ठेवणार आहे”, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.

पहा व्हिडीओ : राजू शेट्टी – पवारांच्या त्या भिजलेल्या सभेनंतर शेतकरी ढेकूळ विरघळल्याप्रमाणे विरघळला

हे वाचलंत का?

Back to top button