Devendra Fadnavis : मुख्यमंत्री बदलाबाबत देवेंद्र फडणवीस यांचा मोठा खुलासा | पुढारी

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री बदलाबाबत देवेंद्र फडणवीस यांचा मोठा खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क : उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील, असे विधान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठा खुलासा करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, अजितदादा मुख्यमंत्री होणार या फक्त वावड्या आहेत. अनेक लोक सध्या पतंगबाजी करू लागले आहेत. परंतु त्यांचे पतंग काटले जातील. दुसरे कुणीही मुख्यमंत्री होणार नाही. महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असतील. कार्यकर्त्यांनी उलटसुलट विधाने करू नयेत. बोलताना प्रत्येकाने भान ठेवावे, अशा कानपिचक्या फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिल्या. अजितदादा मुख्यमंत्री होणार या फक्त वावड्या आहेत. मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही बदल होणार नाही. अजित पवार यांनी स्वत:ही मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. १० , ११ ऑगस्टला काहीही होणार नाही, झाला तर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री शिंदेसह १६ आमदार अपात्र होतील. आणि १० ऑगस्टनंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे भाष्य चव्हाण यांनी केले होते. तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चर्चांना उधाण आले होते.

हेही वाचा 

Back to top button