जुलैमध्ये बँका १५ दिवस बंद; आरबीआयकडून सुट्ट्यांची यादी जाहीर | पुढारी

जुलैमध्ये बँका १५ दिवस बंद; आरबीआयकडून सुट्ट्यांची यादी जाहीर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने जुलै महिन्याच्या बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. पारंपरिक साप्ताहिक सुट्यांव्यतिरिक्त केर पूजा, मोहरम आणि आशुरा या सणांमुळे जुलै महिन्यात बँका १५ दिवस बंद राहणार आहेत.

जुलै महिना सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले असून पुढचा महिना बँकांच्या सुट्ट्यांचा आहे. अशा परिस्थितीत बँकेशी संबंधित कोणतेही काम असल्यास ते त्वरित निकाली काढा. आरबीआयने जारी केलेल्या यादीनुसार, जुलै महिन्यात बँकांना १५ दिवस सुट्टी असेल. यामध्ये चौथ्या शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचाही समावेश आहे. पण याचा अर्थ असा नाही की सर्व शाखांना १५ दिवस सुट्टी असेल. काही बँकांना राज्यानुसार सुट्ट्या असतात.

Back to top button