परबांनी हजार कोटींचा दावा केला, तरी माघार नाही : किरीट सोमय्या | पुढारी

परबांनी हजार कोटींचा दावा केला, तरी माघार नाही : किरीट सोमय्या

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  साई रिसॉर्टप्रकरणी कोणत्याही प्रकारची माघार घेण्याची अथवा माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. अनिल परब यांनी केलेला घोटाळा सिद्ध झाला असून, परब व त्यांचे भागीदार सदानंद कदम यांच्यावर अर्धा डझन प्रकरणात ‘ईडी’, आयकर विभाग, महाराष्ट्र पोलिस, महसूल विभाग, पर्यावरण मंत्रालय यांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे परब यांनी शंभर नाही, हजार कोटींचा दावा दाखल केला; तरी माघार घेणार नसल्याचे आव्हान भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिले.

सदानंद कदम गेले तीन महिने जेलमध्ये आहेत. स्वतःवर होणारी कारवाई थांबवण्यासाठी परब व सदानंद कदम यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे, असा आरोप त्यांनी केला. राष्ट्रीय हरित लवादाकडे सुनावणी सुरू असताना परब आणि कदम यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे म्हणून लवादाला सुनावणी करता येणार नाही, अशी हरकत घेतली. लवादाकडे आपण 2021 मध्ये साई रिसॉर्टचे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठीची याचिका केली होती. ते तोडण्याचे आदेश केंद्र सरकारने व महाराष्ट्र सरकारने काढले आहेत. त्यामुळे लवादामध्ये सुनावणीची गरज नाही, असे सोमय्या म्हणाले.

Back to top button