समीर वानखेडे यांना हेरगिरीप्रकरणी पोलिसांचे समन्स? | पुढारी

समीर वानखेडे यांना हेरगिरीप्रकरणी पोलिसांचे समन्स?

मुंबई ; पुढारी वृतसेवा : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना मुंबई पोलीस समन्स पाठवणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द वानखेडे यांनीच राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे आपल्यावर काही पोलीस पाळत ठेवत असल्याची तोंडी तक्रार केली होती. त्याच तक्रारीनंतर वानखेडे यांना समन्स पाठवले जाणार आहे. या तक्रारीचा भाग म्हणून समीर वानखेडेंची चौकशीही केली जाईल.

मुंबई पोलिसांना याबाबतचे सीसीटीव्ही फुटेजदेखील मिळाल्याची माहिती वानखेडे यांनी दिली होती. त्याबाबतचे पुरावे त्यांनी पोलिसांना दिले आहेत. या सर्व प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी दोन पोलिसांची चौकशीदेखील केली आहे.

समीर यांच्या आईचा ज्या स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला त्या स्मशानभूमीत ते नेहमी जातात. ते 2015 पासून तिथे जातात. या दरम्यान दोन संशयित व्यक्ती त्यांचा पाठलाग करत असल्याचे त्यांना सोमवारी 11 ऑक्टोबर जाणवले होते. विशेष म्हणजे त्यांनी पाठलाग करणार्‍यांचे सीसीटीव्ही फुटेजही काढले होते.

Back to top button