भाजपच्या नेत्यांबाबत बोलाल तर ठाकरेंचे कपडे फाडेन; नितेश राणेंचा संजय राऊतांना इशारा | पुढारी

भाजपच्या नेत्यांबाबत बोलाल तर ठाकरेंचे कपडे फाडेन; नितेश राणेंचा संजय राऊतांना इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : “भाजपच्या नेत्यांबाबत बोलाल तर ठाकरेंची कपडे उतरवताना पाहण्याची तयारी राऊत यांनी ठेवावी. राऊतांसारखे लोक बाजारात विकत मिळतात. ठाकरे कुटुंबियांच्या सर्व गोष्टी आम्हाला माहित आहेत. यापुढे राऊत भाजपवर बोलले तर ठाकरेंचे कपडे फाडेन,” असा धमकीवजा इशारा आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांना दिला. आज ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी राणे म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर राऊत यांनी बोलू नये. त्यांनी विचार करून भाजपवर बोलावे. त्यांच्यासारखे लोक बाजारात विकत मिळतात. आम्ही खरे शिवसैनिक आहोत. राऊतांनी अजून राणेंना ओळखलेल नाही. त्यांच्यामुळे ठाकरे कुटुंबियाची बदनामी होत आहे. उद्धव ठाकरेंवर भ्रष्ठाचार तर आदित्य ठाकरेंवर खूनाचा आरोप झाला आहे. पाक ज्याचे गोडवे गातोय त्या मलिकला राऊत भेटतात. त्यामुळे राऊत यांच्यावर देशद्रोही म्हणून खटला चालवावा, अशी सरकारला विनंती करणार आहे,” असेही राणे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button