हक्कभंग होण्यासारखं विधान केलेलं नाही; माझं विधान एका विशिष्ट गटापुरतं : संजय राऊत | पुढारी

हक्कभंग होण्यासारखं विधान केलेलं नाही; माझं विधान एका विशिष्ट गटापुरतं : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : हक्कभंग होण्यासारखं विधान मी केलेलं नाही; माझं विधान एका विशिष्ट गटापुरतं आहे. मी विधान मंडळाचा अपमान केलेला नाही, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

खा. संजय राऊत म्हणाले, हक्कभंगाच्या नोटिशीला अद्याप उत्तर दिलेलं नाही. माझं विधान एका विशिष्ट गटापुरता आहे. या राज्याची देशाची परिस्थिती आहे. जर तुम्ही अन्यायाविरुध्द आवाज उठवाल तर तुम्हाला देशद्रोही ठरवलं जातं. त्यांनी बेकायदेशीरपणे नाव आण चिन्ह काढून घेतलं. लालू यादव यांची चौकशी होते, मनीष सिसोदियांना अटक होते. मग, ज्यांनी अख्खा देश लुटला त्या अदानीला नोटीस तरी पाठवली का? आम्ही कुणाला घाबरत नाही. आम्ही आणि जनता पूर्णपणे शुद्धीत आहे. भांग पिऊन सत्तेवर कोण आलंय हे सिद्ध झालंय.

 

Back to top button