मुख्यमंत्री-प्रकाश आंबेडकरांची राजगृहावर भेट झाल्याने तर्कवितर्कांना उधाण | पुढारी

मुख्यमंत्री-प्रकाश आंबेडकरांची राजगृहावर भेट झाल्याने तर्कवितर्कांना उधाण

मुंबई;  पुढारी वृत्तसेवा :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील राजगृह या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत युती करण्याबाबत अ‍ॅड. आंबेडकरांनी नुकतेच वक्तव्य केले होते. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भेटीचे निमित्त राजगृह असले, तरी यामागे अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.

या भेटीत मुख्यमंत्र्यांनी राजगृहाची पाहणी केली. या निवासस्थानाचा ऐतिहासिक ठेवा जोपासला जाईल, अशी ग्वाही दिली. राजगृहातील डॉ. बाबासाहेब आणि रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले.

राजगृहाच्या पहिल्या मजल्यावर डॉ. आंबेडकर यांच्या दुर्मीळ वस्तूंचा संग्रह आहे. याच मजल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभ्यासाची खोली आहे. वस्तुसंग्रह, चित्रदालन आणि अभ्यास खोलीची पाहणीही शिंदे यांनी केली. राजगृहातील दुसर्‍या व तिसर्‍या मजल्यावर वास्तव्यास असलेल्या आंबेडकर कुटुंबीयांचीही त्यांनी भेट घेतली.

Back to top button