बलात्कारपीडितेशी विवाह केल्याच्या अटीवर तरूणाला उच्च न्यायालयाकडून जामीन | पुढारी

बलात्कारपीडितेशी विवाह केल्याच्या अटीवर तरूणाला उच्च न्यायालयाकडून जामीन

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  शेजारच्या तरूणीबरोबर विवाहाच्या आणाभाका घेऊन शाररीक संबंध ठेवले. मुलाचा बाप
होण्याची वेळ आल्यावर जबाबदारी झटकणार्‍या आरोपी तरुणाला पिडीत महिलेचा शोध घेऊन वर्षभरात विवाह करण्याची अट घालून मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.

पीडित तरूणी आणि आरोपी शेजारी रहात होते. त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. दोघांच्याही घरच्या मंडळींना याची कल्पना होती. पीडित तरूणी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने लग्नाला नकार दिला. पीडितेने जानेवारी महिन्यात मुंबईतील रुग्णालयात बाळाला जन्म दिल्याच्या तीन दिवसांनी बाळाला मरीन लाईनला सोडून निघून गेली. तेथे
एका सुरक्षारक्षकाने बाळाला ताब्यात घेत पोलिसांना दिले. पोलिसांनी बाळाला अनाथ आश्रमात ठेवले. मुलीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

त्यानंतर पीडित तरूणीने आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करून समाजाच्या भीतीपोटी ती बेपत्ता झाली.आपल्या गर्भारपणामुळे कुटुंबाची मानहानी होऊ नये म्हणून मुलीने हा निर्णय घेतला. दरम्यान तरुणीने गुन्हा दाखल केल्याने आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीने जामीनासाठी तसेच गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेत अर्ज केला होता. त्या अर्जावर न्या. भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने आरोपीला  पीडीत तरूणीशी वर्षभरात विवाह केल्यास जामीन दिेण्याची तयारी
दर्शविली.

आरोपीने न्यायालयाची अट मान्य केली तशी लेखी हमीही न्यायालयाला दिली. ऐवढेच नव्हे तर त्या मुलाचे पालकत्व स्वीकारण्याची तयारी दर्शविली.आरोपीच्या आई वडिलांनी ही न्यायालयात तसे प्रतिज्ञापत्र सादर केले. याची न्यायालयाने दखल धेतली. पीडीत तरूणी सज्ञान आहे. तिच्याशी विवाह करण्यास आरोपी तयार आहे. त्या दोघांचेही प्रेमसंबंध होते. त्यामुळे एका वर्षात जर ती सापडली तर आरोपीने तिच्याबरोबर लग्न करावे. जर एका वर्षात पिडीतेचा शोध लागला नाही तर, आरोपी या अटीतून मुक्त होईल, असा आदेश न्यायालयाने तरुणाला जामीन देताना
दिला.

Back to top button