वीज दरात वाढ; पहा जूनपासून किती असणार दरवाढ | पुढारी

वीज दरात वाढ; पहा जूनपासून किती असणार दरवाढ

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : कोळसा आणि इंधनाचे दर वाढल्यामुळे महावितरणने इंधन समायोजन आकारात मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाढीचा थेट फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.

राज्य वीज नियामक आयोगाने या दरवाढीला हिरवा झेंडा दिला आहे. मार्च ते मे २०२२ मध्ये ० ते १०० युनिटसाठी इंधन समायोजन आकारापोटी १० पैसे आकारले जात होते. जुनपासून हा आकार ६५ पैसे करण्यात आला आहे. १०१ ते ३०० युनिटसाठी २० पैसे आता १ रुपये ४५ पैसे, ३०० ते ५०० युनिटसाठी २५ पैसे दर आता २ रुपये ५ पैसे करण्यात आला आहे. तर ५०१ युनिटच्यापुढे २५ पैसे असलेला दर आता २ रुपये ३५ पैसे करण्यात आला आहे. जून ते हे नवीन दर लागू होतील. कोळसा आणि अन्य इंधनाचे दर यापुढेही वाढतेच राहिले तर, महावितरणही आपल्या वीज दरात वाढ करू शकते, अशी शक्यता महावितरणमधील एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.

हेही वाचा

Back to top button