मालाड किनाऱ्यावर आढळला मृत डॉल्‍फिन | पुढारी

मालाड किनाऱ्यावर आढळला मृत डॉल्‍फिन

मालाड; पुढारी वृत्‍तसेवा : मालाड पश्चिमेतील मढ बेट येथील दाना पानी समुद्र किनाऱ्यावर काही तरुण सफाई करत असताना त्यांना मृत डॉल्फिन मासा आढळला. किप होप अलाईव्ह फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून तरुण दर आठवड्याला दाना पानी समुद्र किनाऱ्यावर सफाई करतात. रविवारी किनारा स्वच्छ करण्यास हे तरूण गेले असताना एक मोठा मासा झुडपात अडकलेला दिसला.

लगेचच सर्व तरुण एकत्र जमले व त्यांनी हा मासा जिवंत आहे का मृत याची खात्री केली. यानंतर 25 ते 30 तरुणांनी या माशाला झुडपातून बाहेर काढले. त्‍यावेळी हा मासा डॉल्फिन असल्‍याचे त्‍यांच्या लक्षात आले. यानंतर या तरूणांनी हा मासा किनाऱ्यावर मोठा खड्डा काढून पुरला. या बाबतची माहिती तरूणांनी आकसा बीच पोलीस बिट येथील पोलिसांना दिली.

Back to top button