सरकारच्या दबावाखाली माझ्यावर एफआयआर दाखल : प्रवीण दरेकर | पुढारी

सरकारच्या दबावाखाली माझ्यावर एफआयआर दाखल : प्रवीण दरेकर

मुंबई; पुढारी ऑनलाईन : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. प्रवीण दरेकर यांना आज (सोमवार) रमाबाई आंबेडकर पोलिस स्‍टेशनमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. मुंबै बँक मजूर प्रकरणात मुंबई पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर प्रविण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारच्या दबावाखाली एफआयआर दाखल झाला आहे. माझ्यावर कार्यवाही करण्याचा सरकारचा दबाव आहे आणि मी या प्रकरणात चौकशीला सामोरे जाणार असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. मी या प्रकरणात संपुर्ण सहकार्य करणार असून कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गडबड करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

झोपलेल्यांना जागे करता येते. परंतु, झोपेचे सोगं घेणाऱ्याला जागं करता येत नाही असा टोमणाही त्यांनी मारला आहे. या प्रकरणात कुठल्याही प्रकारचा गुन्हा नसताना सरकारच्या दबावाखाली भाजपच्या नेत्याला नाहक त्रास द्यायचा या भावनेतूनच हे करत आहेत. पण कर नाही त्याला डर कशाला, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button