‘पुढारी’च्या रेस्क्यू बोटीने वाचवले १५ जणांचे प्राण; कराडच्या पाल येथे मदतकार्य

पाल : दै. ‘पुढारी’च्या याच रेस्क्यू बोटीमुळे पुरात अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचविण्यात आले.
पाल : दै. ‘पुढारी’च्या याच रेस्क्यू बोटीमुळे पुरात अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचविण्यात आले.

दै. 'पुढारी' रिलिफ फाऊंडेशनच्या वतीने पूरग्रस्तांसाठी अत्याधुनिक यांत्रिक बोट, दहा जीवनरक्षक जॅकेट, लहान मुलांसाठी पाच जीवनरक्षक जॅकेट, दहा बिओरिंगसह अन्य साधने काही महिन्यांपूर्वी दिली होती. यावेळी यांत्रिक बोटीसह जीवनरक्षक जॅकेट व बिओरिंग आदी साहित्य कराड नगरपालिकेकडेे सुपूर्द करण्यात आले होते. या रेस्क्यू बोटीमुळे पाल येथील नागरिकांना पुरामधून यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आले.

'पुढारी'ने दिलेल्या रेस्क्यू बोटीमुळे नागरिकांचे प्राण वाचवण्यात यश आल्यामुळे कराड पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दै. 'पुढारी'चे आभार मानले.

मुसळधार पावसामुळे तारळी पूल पाण्याखाली गेल्याने पाल येथील खंंडोबा मंदिरासह मंदिर परिसर व व्यापारीपेठेला पुराचा वेढा पडला होता. नगरपालिकेने ग्रामस्थांंच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवून पंधराजणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळविले.

मागील वर्षीच्या महापुरामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना तडाखा बसला होता. मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली होती.

'पुढारी रिलिफ फाऊंडेशन'ने जनतेला पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले होते. जनतेने या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. यातून जमा झालेल्या निधीतून कराड नगरपरिषदेला जीवनरक्षक साधनांसह अत्याधुनिक यांत्रिक बोट देण्यात आली आहे. बोटीला 25 एचपी टू स्ट्रोक इंजिन असून, त्यामुळे ही बोट अडचणीच्या व धोकादायक ठिकाणी गतिमान पद्धतीने कार्य करते. या बोटीने पाल येथे पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यातआल्याने दै. 'पुढारी' व कराड नगरपालिकेस पाल नागरिकांनी धन्यवाद दिले आहेत.

दै. 'पुढारी'कडून मिळालेल्या यांत्रिक बोटीमुळे पाल (ता. कराड) येथील पूरस्थितीत आम्हाला 15 नागरिकांचे जीव वाचवणे शक्य झाले. दै.'पुढारी' नेहमीच सर्वसामान्यांना मदत करण्यास तत्पर असतो. 'पुढारी'ने दिलेल्या बोटीमुळे आम्ही 15 जणांना जीवदान देऊ शकलो. नगरपालिका नेहमीच 'पुढारी'ची ऋणी राहील.
– रमाकांत डाके, मुख्याधिकारी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news