पॉर्न व्‍हिडीओ रॅकेट : शिल्‍पा शेट्‍टी-राज कुंद्राच्‍या जॉइंट अकाउंटवर विदेशातून पैसे जमा | पुढारी

पॉर्न व्‍हिडीओ रॅकेट : शिल्‍पा शेट्‍टी-राज कुंद्राच्‍या जॉइंट अकाउंटवर विदेशातून पैसे जमा

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : पॉर्न व्‍हिडीओ रॅकेट प्रकरणातील तपासात दरराेज नवे खुलासे हाेत आहेत. शिल्‍पा शेट्‍टी आणि राज कुंद्राच्‍या जॉइंट अकाउंटवर विदेशातून पैसे जमा होत होते, अशी माहिती समोर आली आहे. त्‍यामुळे आता पॉर्न व्‍हिडीओ रॅकेट प्रकरणानंतर मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्‍तवसुली संचलनालय (ईडी) शिल्‍पा शेट्‍टी आणि राज कुंद्रा यांची चौकशी करणार असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

अधिक वाचा 

आर्थिक अनियमताप्रकरणी मुंबई पोलिस ‘ईडी’ला चौकशी करण्‍याची विनंती करेल. २६ जुलैनंतर शिल्‍पा शेट्‍टी आणि राज कुंद्रा यांच्‍यावर परकीय चलन विनिमय कायद्‍यानुसार (फेमा) कारवाई होण्‍याची शक्‍यता आहे, असे सूत्रांनी स्‍पष्‍ट केले.

अधिक वाचा 

फेब्रुवारी महिन्‍यातच एका मॉडलने पॉर्न व्‍हिडिओ रॅकेटमध्‍ये राज कुंद्राचा सहभाग असल्‍याचा गौप्‍यस्‍फोट केला होता.

या  प्रकरणाची मुंबई पोलिसांनी सखोल चौकशी केली.

पुरावे हाती लागल्‍यानंतर राज कुंद्रा याला अटक केली. त्‍याच्‍या विआन कंपनीच्‍या कार्यालयाची झडती घेत साडेसात कोटींची संपत्‍तीही पोलिसांनी जप्‍त केली आहे.

राज कुंद्राने पार्न व्‍हिडिओ निर्मितीमधून लाखो रुपये कमवले. तर व्‍हिडीओमध्‍ये काम करणार्‍या अभिनेत्रींना तो केवळ आठ ते १० हजार रुपये देत असे, अशीही माहिती तपासात समोर आली होती.

अधिक वाचा

शिल्‍पा शेट्‍टीकडून पतीचा बचाव

पोलिसांनी शुक्रवार २३ जुलै रोजी अभिनेत्री शिल्‍पा शेट्‍टी हिची चौकशी केली होती. तसेच तिच्‍या घराची झडतीही घेतली होती.

यावेळी शिल्‍पा शेट्‍टीला २० ते २५ प्रश्‍न विचारण्‍यात आले. यातील बहुतांश प्रश्‍न हे विदेशातून येणार्‍या पैशांबाबत होते.

एका राष्‍ट्रीय बँकेत शिल्‍पा शेट्‍टी आणि राज कुंद्रा यांचे जॉइंट अकाउंट (संयुक्‍त खाते) आहे.

या खात्‍यावर विदेशातून पैसे जमा होत होते. त्‍याचबरोबर शिल्‍पा शेट्‍टीच्‍या बँक खात्‍यावर दक्षिण अफ्रिका आणि लंडन येथून पैसे जमा झाल्‍याची माहिती तपासात समाेर आली आहे.

यासंदर्भातील कोणतीही माहिती प्राप्‍तीकर विभागाला देण्‍यात आलेली नव्‍हती.

शिल्‍पा शेट्‍टी हिला पती राज कुंद्राच्‍या सर्व आर्थिक व्‍यवहारांची माहिती होती. मात्र आता त्‍याच्‍या बचावासाठी ती पुढे आली आहे, असे म्‍टहले जात आहे.

‘माझा पती निर्दाष…अश्‍लील नव्‍हे श्रृंगारिक चित्रपटांची निर्मिती’

माझा पती निर्दोष आहे. तो पॉर्न(अश्‍लील) नव्‍हे श्रृंगारिक चित्रपटांची निर्मिती करत होता, असा दावा शिल्‍पा शेट्‍टीने मुंबई पोलिसांच्‍या चौकशीवेळी केला आहे.

मुंबई पोलिसांच्‍या गुन्‍हे अन्‍वेषण विभागाच्‍या पथकाने शिल्‍पा शेट्‍टीची सहा तास चौकशी केली.

यावेळी पॉर्न (अश्‍लील) व्‍हिडिओ रॅकेट प्रकरणी तिचा जबाब नोंदवला गेला.

सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पॉर्न व्‍हिडिओच्‍या निर्मितीमध्‍ये त्‍याचा सहभाग नसल्‍याचा दावा शिल्‍पा शेट्‍टीने केला आहे.

‘हॉटशॉटस’ ॲपवरील चित्रपट हे पोर्न नाहीत तर श्रृंगारिक आहेत. या चित्रपटांपेक्षा अधिक अश्‍लील चित्रपट ‘ओटीटी’वर उपलब्‍ध असल्‍याचेही तिने म्‍टहले आहे.

या प्रकरणी राज कुंद्राच्‍या बहिणीच्‍या नवरा प्रदीप बक्षी याला तिने दोषी ठरवले आहे.

लंडनमध्‍य वास्‍तव्‍यास असणार्‍या प्रदीप बक्षी यानंच ‘हॉटशॉट’वर पाॅर्न चित्रपट अपलाेड करीत होता.

तो कोणते चित्रपट अपलोड करत आहे याची कल्‍पनाच राज कुंद्राला नव्‍हती, असा दावाही तिने केल्‍याचे सूत्रांनी म्‍हटले आहे.

याप्रकरणी राज कुंद्रा याला २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनवण्‍यात आली आहे. कुंद्रा याच्‍यासह ११ जणांना अटक करण्‍यात आली आहे.

१२१ पॉर्न व्‍हिडीओची आंतरराष्‍ट्रीय बाजारपेढेत ९ कोटी रुपयांना विक्री केल्‍याचा आरोप राज कुंद्रावर ठेवण्‍यात आला आहे.

हेही वाचलं का ?

पाहा व्‍हिडीओ : गायी पाळणाऱ्या मुंग्यांची गोष्ट

 

Back to top button