

चेन्नई ; पुढारी ऑनलाईन : कार अपघातात अभिनेत्री यशिका आनंद गंभीर जखमी झाली आहे. या दुर्घटनेत अभिनेत्री यशिका आनंद हिची मैत्रीण जागीच ठार झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
अधिक वाचा
रविवारी पहाटे कारमध्ये चारजण जात होते. ईस्ट कोस्ट रोडवर भरधाव वेगात असणारी कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले.कार दुभाजकाला जावून आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की, यशिकाची मैत्रीण जागीच ठार झाली.
गंभीर जखमी झालेल्या यशिकाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कार कोण चालवत होते आणि चालकाने मद्यपान केले होते का, याचा तपास पोलिस करीत आहेत.
यशिका ही[ तामिळनाडूमधील प्रसिद्ध मॉडेल आहे. अनेक चित्रपटांमध्ये तिने सहायक अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये कवलई वेंदम, नोटा आणि ध्रुवांगल पथीनारु या चित्रपटांचा समावेश आहे. तामिळ बीग बॉस २ मध्येही यशिकाने भाग घेतला होता.
हेही वाचलं का?