रोईंग डबल स्‍कल्‍स : अर्जुन-अरविंद सेमीफायनलमध्‍ये

रोईंग डबल स्‍कल्‍स : अर्जुन-अरविंद सेमीफायनलमध्‍ये
Published on
Updated on

नवी दिल्‍ली; पुढारी ऑनलाईन: टोकियो ऑलिम्पिकमध्‍ये रोईंग पुरुष डबल स्‍कल्‍स स्‍पर्धेत भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली. रोईंग डबल स्‍कल्‍स स्‍पर्धेत अर्जुन लाल आणि अरविंद सिंग यांनी सेमीफायनलमध्‍ये प्रवेश केला.

अधिक वाचा 

अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग यांच्‍या जोडीने तिसरे स्‍थान फटकावले. यामुळे या दोघांचे सेमीफायनलमध्‍ये प्रवेश
निश्‍चित झाला.

सामना सुरु झाल्‍यानंतर १ हजार मीटरपर्यंत ही जोडी चौथ्‍या स्‍थानावर होती. यानंतर त्‍यांनी मुसंडी मारत तिसर्‍या स्‍थानांवर पोहचले. या स्‍पर्धेत पोलंड आणि स्‍पेन अनुक्रमे पहिल्‍या व दुसर्‍या स्‍थानावर राहिले. आता मंगळवार, २७ रोजी सेमीफायनल होणार आहे.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news