सुमित नागल : २५ वर्षाची प्रतिक्षा संपली, टेनिसमध्‍ये विजयी सलामी | पुढारी

सुमित नागल : २५ वर्षाची प्रतिक्षा संपली, टेनिसमध्‍ये विजयी सलामी

नवी दिल्‍ली; पुढारी ऑनलाईन: सुमित नागल याने आज टेनिसमधील पुरुष एकेरीतील गेली २५ वर्ष असणारा विजयाचा दुष्‍काळ संपवला. सुमित नागल याने उजेबिस्‍तानच्‍या डेनिस इस्‍तोमीन याचा ६-४,६-७ (६),६-४असा पराभव केला.

अधिक वाचा 

ऑलिम्पिक स्‍पर्धेत पुरुष एकेरीतील सामना जिंकणारा सुमित नागरला हा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. १९८८ मध्‍ये सेउल ऑलिम्‍पिकमध्‍ये जीशन अली यांनी पहिल्‍या फेरीतील सामना जिंकला होता. तर १९९६ मध्‍ये अटलांटा ऑलिम्पिकमध्‍ये लियंडर पेस याने कास्‍य पदक पटकावले होते.

अधिक वाचा

२३ वर्षीय सुमित आणि डेनिस यांच्‍यातील सामना २ तास ३४ मिनिटे चालला. सुमित हा जून १४ रोजी टेनिस एकेरीमधील जागतिक कम्रवारीत १४४व्‍या स्‍थानावर होता. सध्‍या तो १६० व्‍या क्रमवारीवर आहे. क्रमवारीचा विचार करता डेसिनचे पारडे जड होते. मात्र सुमित याने डेनिसचा पराभव केला.

अधिक वाचा 

सुमितचा पुढील सामना जागतिक क्रमवारीतील दुसर्‍या क्रमाकाचा खेळाडू मेदवेदेव यांच्‍याबरोबर होणार आहे.

२०१९च्‍या अमेरिकन ओपन टेनिस स्‍पर्धेतील सुमित याचा पहिलाच सामना रॉजर फेडररबरोबर होता. यावेळी त्‍याने पहिला सेट जिंकत रॉजर फेडरललाही झूंज देवू शकतो हे दाखवून दिले होते.

सुमित यांचा खेळ खूपच प्रभावी आहे, असे गौरवाद्‍गार रॉजर फेडरर याने या वेळी काढले होते.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडिओ : कोल्हापूर शहर महापुराच्या विळख्यात

Back to top button