फोन हॅकिंग प्रकरणी संसदेत गोंधळ; कामकाज दुपारपर्यंत स्‍थगित | पुढारी

फोन हॅकिंग प्रकरणी संसदेत गोंधळ; कामकाज दुपारपर्यंत स्‍थगित

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन:  पिगासस फोन हॅकिंग प्रकरणावरून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने आज लोकसभेचे कामकाज २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.

अधिक वाचा: 

फोन हॅकिंग प्रकरणाच्या गोंधळात अकरा वाजता संसदेचे अधिवेशन सुरू झाले.विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभेत पिगासस प्रकरणी नोटिसा दिली होती. त्यावर चर्चा करण्यात यावी, अशी भूमिका आग्रह विरोधी पक्षाच्‍या सदस्‍यांनी घेतली. गोंधळात कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी बोलण्यास उभे राहिले. त्यांचे निवेदन संपेपर्यंत गोंधळ सुरूच होता.

विरोधी खासदारांनी हातात फलक घेऊन सभापतींच्या आसनापुढे येत गोंधळ सुरू ठेवला. सभापती ओम बिर्ला यांनी वारंवार सूचना देऊनही घोषणाबाजी सुरूच राहिली. यामुळे बिर्ला यांनी सदनाची कार्यवाही २ वाजेपर्यंत स्थगित करण्याची घोषणा केली.

अधिक वाचा: 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आज ‘पिगासस’ फोन हॅकिंगबरोबरच महागाई, पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमती, कृषी कायदे यांवरून विराेधी पक्षाच्‍या सदस्‍यांनी सरकारची कोंडी केली.

अधिक वाचा: 

सकाळी सदन सुरू होण्याआधी संसदीय दलाची बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. तसेच काँग्रेसच्या खासदारांचीही बैठक झाली होती.

हेही वाचलेत का: 

पहा व्हिडिओ: आरे जंगलातल्या रानभाज्या

Back to top button