१०६ नगरपंचायतींपैकी ९७ नगरपंचायतींचे निकाल हाती; कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या ? | पुढारी

१०६ नगरपंचायतींपैकी ९७ नगरपंचायतींचे निकाल हाती; कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या ?

मुंबई : पुढारी ऑनलाईन

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 93 नगरपंचायतींमधील 336 जागांसाठी मंगळवारी (ता.18) सरासरी 81 तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या 23 आणि त्यांतर्गतच्या पंचायत समितीच्या 45 जागांसाठी 73 टक्के मतदान झाले होते.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर चार विविध महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते; परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार या कार्यक्रमात अंशत: बदल करण्यात आला.

१०६ नगरपंचायतींपैकी ९७ नगरपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. अन्य ९ नगरपंचायतीचे निकाल उद्या घोषित होणार आहेत. एकूण निकालामध्ये भारतीय जनता पक्षाने २४ नगरपंचायतींमध्ये ४१६ जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने २५ नगरपंचायतीमध्ये ३८७ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसने १८ नगरपंचायतींमध्ये २९७ जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेने १४ नगरपंचायतींमध्ये ३०० जागा मिळवल्या आहेत. इतर १६ ठिकाणी विजयी झाले आहेत

या सर्व ठिकाणी आज मतमोजणी झाली. यामध्ये दुपारपर्यंत हाती आलेल्या निकालांमध्ये महाविकास आघाडीची सरशी झाली असली, तरी भाजपने एकहाती जोरदार घौडदौड केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा तत्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मंगळवारी मतदान झाले. अन्य सर्व जागांसाठी मात्र पूर्वनियोजितपणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान पार पडले होते.

राज्य निवडणूक आयोगाने एकूण 106 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. त्यातील तलासरी, विक्रमगड, मोखाडा, पेठ, सुरगाणा, धडगाव- वडफळ्या- रोषणमाळ, झरी- जामणी, मुलचेरा, एटापल्ली, कोरची, भामरागड या 11 नगरपंचायतींमध्ये एकही जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव नव्हती. त्यामुळे तेथे सर्व जागांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान पार पडले.

उरलेल्या 95 नगरपंचायतींतील अनारक्षित झालेल्या 344 जागांसाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार होते. त्यापैकी शिर्डीतील 4 आणि कळवणमधील 2 जागा बिनविरोध झाल्याने तेथे मतदानाची आवश्यकता राहिली नाही. त्याचबरोबर माळशिरस आणि देवळा येथेही प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली. त्यामुळे आता 93 नगरपंचायतींतील 336 जागांसाठी आज मतदान झाले.

हे ही वाचलं का ?

Back to top button