विटा : खानापूर नगरपंचायतमध्‍ये सुहास शिंदे यांची सत्ता कायम | पुढारी

विटा : खानापूर नगरपंचायतमध्‍ये सुहास शिंदे यांची सत्ता कायम

विटा : पुढारी वृत्तसेवा

खानापूर नगरपंचायतच्या पंचवार्षिक निवडणूकीत सत्ताधारी आमदार अनिलराव बाबर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-शिवसेना महाविकास आघाडीला १७ पैकी ९ जागी यश मिळाले, त्यामुळे इथली सत्ता कायम राहिली. तर विरोधी जनता आघाडीला ७ जागा मिळाल्या मात्र भाजपची पाटी कोरीच राहिली.

खानापुरात सुहास शिंदे यांची सत्ता कायम

खानापूर नगरपंचायतच्या इतिहासात अत्यंत काटा लढत होऊनही सुहास शिंदे यांना सत्ता टिकवण्यात यश आले आहे. यात शिवसेना- काँग्रेस महाविकास आघाडीला ९ जागा मिळाल्या. तर माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील सचिन शिंदे, राजेंद्र माने, राजाभाऊ शिंदे आणि अनिल शिंदे यांच्या संयुक्त गटाच्या जनता आघाडीने चांगली लढत दिली. त्यांना ७ जागा मिळवल्या असून, एक अपक्ष निवडून आला आहे. निकालानंतर सत्ताधारी गटाने फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषात केला.

खानापूर नगरपंचायत पंचवार्षिक निवडणूक

खानापूर नगरपंचायतची निवडणूक अतिशय रंगतदार अशीच झाली. शहरातील दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणावर ताकद लावण्यात आली होती. अत्यंत अटीतटीने झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना – काँग्रेस महाविकास आघाडीला ९ जागी विजय मिळवता आला. यात प्रामुख्याने डॉ. उदयसिंह हजारे यांची मुख्य भूमिका गटास तारणारी ठरली. तर विरोधी जनता आघाडीने ७ जागी विजय मिळवत मोठी लढत दिली. यात जनता आघाडीचे प्रमुख नेते राजेंद्र माने किंगमेकर ठरले. त्याचबरोबर जनता आघाडी तून वगळलेल्या एका उमेदवाराने थेट अपक्ष म्हणून लढत विजय मिळवत वादळात दिवा लावला आहे.

पंचायत मध्ये प्रभागवार विजयी झालेले उमेदवार,पक्ष व गट आणि त्यांना पडलेली मते 

प्रभाग क्रमांक -१
सुहास सर्जेराव ठोंबरे – जनता आघाडी-१०८

प्रभाग क्रमांक -२
पुष्पलता अशोक माने- जनता आघाडी-१५५

प्रभाग क्रमांक -३
जयश्री स्वप्निल मंडले -काँग्रेस-१८५

प्रभाग क्रमांक-४
माणकाबाई मल्हारी ठोंबरे-काँग्रेस-१३०

प्रभाग क्रमांक-५
सुनील प्रभाकर मंडले-काँग्रेस-९१

प्रभाग क्रमांक-६
चंदना पांडुरंग भगत- शिवसेना-९३

प्रभाग क्रमांक-७
सुवर्णा प्रल्हाद कांबळे-काँग्रेस-१४४

प्रभाग क्रमांक-८
राजेंद्र आनंदराव माने- जनता आघाडी-१६८

प्रभाग क्रमांक-९
डॉ.उदयसिंह विजयसिंह हजारे-शिवसेना-१५६

प्रभाग क्रमांक-१०
मारुती कुंडलिक भगत- जनता आघाडी-११६

प्रभाग क्रमांक-११
जैबून आरिफ पिरजादे-काँग्रेस-१५२

प्रभाग क्रमांक-१२
आनंदकुमार बाबुराव जंगम- जनता आघाडी- १६१

प्रभाग क्रमांक-१३
यशवंत किसन तोडकर-जनता आघाडी-१५७

प्रभाग क्रमांक-१४
मेघना रविकिरण हिंगमिरे-शिवसेना-१२६

प्रभाग क्रमांक-१५
रोहित प्रकाश त्रिंबके- अपक्ष-६३

प्रभाग क्रमांक-१६
सुमन लालासाहेब पाटील-शिवसेना-१२०

प्रभाग क्रमांक-१७
उमा रामचंद्र देसाई- जनता आघाडी-१९३

हेही पाहा; प्रा. एन. डी. पाटील अखेरचा लाल सलाम

 

Back to top button