जळगाव : बोदवड नगरपंचायतीवर फडकला शिवसेेनेचा भगवा ; गिरीश महाजन यांना धक्का

जळगाव : बोदवड नगरपंचायतीवर फडकला शिवसेेनेचा भगवा ; गिरीश महाजन यांना धक्का
Published on
Updated on

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

बोदवड नगरपंचायतीच्या निकालामध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकहाती सत्ता काबीज केली आहे. नगरपंचायत शिवसेनेचे 9 राष्ट्रवादीचे 7 तर भाजपाला (एक जागा) ईश्वर चिठ्ठीने खाते उघडता आले. काँग्रेसचा एकही उमेदवार विजयी नाही. आमदार गिरीश महाजन यांना मतदारांनी जोरदार धक्का दिला आहे.

बोदवड नगरपंचायत भाजपा सत्ता होती. शेवटच्या काळात सर्व उमेदवारांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला होता. यामुळे बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकवण्याचे आमदार चंद्रकांत पाटील यशस्वी झाले होते. त्यामुळे बोदवड नगरपंचायतीवर कोणाचे वर्चस्व स्थापन होईल याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. यात मुख्यत: एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खेवलकर-खडसे विरुद्ध आमदार चंद्रकांत पाटील अशीच लढत दिसत होती. यात चंद्रकांत पाटील यांनी बोदवड नगरपंचायतवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकविला आहे.

बोदवड नगरपंचायतीच्या  मतमोजणीला सकाळी दहा वाजेला पाच टेबलावर मतमोजणीला सुरुवात झाली होती. बोदवड नगरपंचायती मध्ये सेना-भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत दिसत होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भुसावळचे प्रांत रामसिंग सुलाने तहसीलदार योगेश्वर टोम्पे बोदवड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आकाश डोईफोडे तर ऑब्झर्वर म्हणून अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन हे उपस्थित आहे. तर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त मतमोजणीच्या ठिकाणी ठेवलेला होता.

प्रभाग क्रमांक 1   गायकवाड रेखा सजू (शिवसेना) 466
प्रभाग क्रमांक 2  पाटील कडूसिंग पांडुरंग( राष्ट्रवादी कॉग्रेस) 367
प्रभाग क्रमांक 3 खेवलकर  योगिता गोपाळ (राष्ट्रवादी कॉग्रेस) 405
प्रभाग क्रमांक 4  सैय्यद  सईदा बी रशीद (राष्ट्रवादी काँग्रेस,)551

प्रभाग क्रमांक 5- मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप उमेदवार याना 374 अशी समसमान मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी ने निकाल देण्यात आला. इयत्ता 4 थी मधील आराध्या विजय अग्रवाल हिने ईश्वर चिठ्ठी काढली असता बडगुजर विजय भाजप चे उमेदवार विजयी झाले आहे.

प्रभाग क्रमांक 6  जैन पूजा प्रिंतेश( शिवसेना )302
प्रभाग क्रमांक 7  पारधी पूजा संदीप (राष्ट्रवादी काँग्रेस ) 244
प्रभाग क्रमांक 8  शेख एकताबी लतीफ (राष्ट्रवादी काँग्रेस) 431
प्रभाग क्रमांक 9  पाटील आनंदा रामदास (शिवसेना )506
प्रभाग क्रमांक 10  बडगुजर मंजुषा कैलास (शिवसेना) 380
प्रभाग क्रमांक 11  भोई बेबी रमेश (शिवसेना )439
प्रभाग क्रमांक 12  बोरसे शारदा सुनील (शिवसेना)557
प्रभाग क्रमांक 13 बागवान सईद इब्राहीम (शिवसेना)
प्रभाग क्रमांक 14 शेख जफर अलताफ (राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग क्रमांक 15 शाह मुजमिज शाह मुजारफर शाह (राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग क्रमांक 16  माळी बेबीबाई विनोद (शिवसेना)473
प्रभाग क्रमांक 17  माळी मिरा दिनेश (शिवसेना)816

बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस 17, भाजप 13, कॉग्रेस 8, शिवसेना 17, अपक्ष 13 असे एकूण 68 उमेदवार रिंगणात होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news