बुलडाणा : मोताळा नगरपंचायतीवर काँग्रेस, संग्रामपूरवर 'प्रहार'चा झेंडा - पुढारी

बुलडाणा : मोताळा नगरपंचायतीवर काँग्रेस, संग्रामपूरवर 'प्रहार'चा झेंडा

बुलडाणा : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील मोताळा व संग्रामपूर या दोन नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत.
मोताळा नगरपंचायतीच्या एकूण 17 जागा पैकी काँग्रेसने 12 जागा मिळवत स्पष्ट बहूमत मिळवले.  शिवसेनेला 4 तर राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली. भाजपला येथे खाते उघडता आले नाही.

संग्रामपूर नगरपंचायतीच्या एकूण 17 जागा आहे. यामध्ये राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने 12 जागा मिळवत भाजपचा सुफडासाफ केला. भाजप आमदार डाॅ. संजय कुटे यांना जबर धक्का दिला आहे. संग्रामपुरात राष्ट्रवादी व वंचित बहूजन आघाडीलाही खाते उघडता आले नाही. संग्रामपूर नगरपंचायतीमध्ये काँग्रेसला 4 तर शिवसेनेला 1 जागा मिळाली आहे.

हे ही वाचलत का?

Back to top button