बीड : केज नगरपंचायतीत जनविकास परिवर्तन आघाडीची सत्तेच्या दिशेने वाटचाल | पुढारी

बीड : केज नगरपंचायतीत जनविकास परिवर्तन आघाडीची सत्तेच्या दिशेने वाटचाल

केज (बीड) : पुढारी वृत्तसेवा

केज नगर पंचायतीच्या सतरा जागेसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत जनविकास परिवर्तन आघाडीला बहुमताच्या जवळ पोहोचली आहे. जनविकास परिवर्तन आघाडीला ८ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला ५, नगर पंचायतीत दोन टर्म सत्तेवर असलेल्या सत्ताधारी काँग्रेसला ३ जागेवरच समाधान मानावे लागले आहे.

“गड आला पण सिंह गेला जनविकासचे प्रमुख हारून इनामदार पराभूत तर त्यांची पत्‍नी विजयी झाली. राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे याची कन्याही पराभूत झाल्‍या आहेत. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाने एकाच जागेवर निवडणूक लढवीत एका जागेवर विजय प्राप्त केला आहे.

विशेष म्हणजे जिल्ह्यात खासदार व केज विधानसभेत आमदार हा भाजपचा असताना त्यांनी तर निवडणुकच लढविली नव्हती. तर १३ जागांवर निवडणूक लढविणाऱ्या शिवसेनेला भोपळाही फोडता आली नाही. त्यामुळे आता केज नगर पंचायतीच्या सत्तेत बहुमतासाठी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाच्या रांजणकर यांचे महत्‍व वाढले आहे.

Back to top button