Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या माजी गृहमंत्र्यांच्या सुनेने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; भाजपमध्ये करणार प्रवेश | पुढारी

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या माजी गृहमंत्र्यांच्या सुनेने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; भाजपमध्ये करणार प्रवेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (दि.२९) भेट घेतली. त्या शनिवारी (दि.३०) मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास काँग्रेससाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. Lok Sabha Election 2024

भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी ‘दै. पुढारी’शी बोलताना सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य मान्यवरांच्या उपस्थिती हा प्रवेश होणार आहे. दरम्यान, शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जाणारे बसवराज पाटील मुरूमकर हे काही दिवसांपूर्वी भाजपवासी झाले आहेत. त्यावेळेपासूनच अर्चना पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. विशेष म्हणजे अर्चना पाटील यांच्या मुलीचे लग्न असल्यामुळे त्यांना त्यावेळी प्रवेश करता आला नाही. आता मात्र तो योग जुळून आला आहे.

दरम्यान,  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसला मराठवाड्यात आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. डॉ. अर्चना पाटील चाकूरकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. डॉ. अर्चना पाटील चाकूरकर या माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई आहेत.

शिवराज पाटील काँग्रेसमधील मोठे नेते मानले जातात. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती. ते गांधी कुटुंबीयाचे निकटवर्तीय मानले जातात. आता त्यांची सूनबाई हातात कमळ घेणार असल्याने हा काँग्रेससाठी मोठी धक्का असेल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

हेही वाचा 

Back to top button