सलग तिसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये भेसळयुक्त खाद्यपदार्थांवर कारवाई; पावणे दोन लाखांचे खाद्यतेल जप्त | पुढारी

सलग तिसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये भेसळयुक्त खाद्यपदार्थांवर कारवाई; पावणे दोन लाखांचे खाद्यतेल जप्त

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ऐन सणासुदीच्या तोंडावर शहरात भेसळयुक्त खाद्यअन्नाचा साठा पकडण्याचा धडाका अन्न व औषधी प्रशासनाने लावला आहे. शुक्रवारी भेसळयुक्त मिठाई बनविणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केल्यानंतर शनिवारी दीड लाख रुपयांची नकली मिठाई जप्त केली होती. तर रविवारी (दि.२२) जुन्या मोंढ्यात छापा टाकून तब्बल पावने दोन लाख रुपयांचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त केले. विजयादशमीच्या तोंडावर सलग तिसऱ्या दिवशी भेसळीच्या मोठ्या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

दरवर्षी दसरा-दिवाळीत मिठाई, खवा, मावा, बर्फी, नमकीन आदी खाद्यपदार्थांना मागणी वाढते. त्यामुळे या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. आणि हलक्या दर्जाचा खाद्यतेल वापरला जातो. हे प्रकार रोखण्यासाठी व ग्राहकांना सुरक्षित व सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषधी प्रशासनाने कारवाईची मोहीम उघडली आहे. यात रविवारी शहरातील जुना मोंढा भागातील महेश खोंडे यांच्या बालाजी ट्रेडिंग कंपनी येथे अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकत तब्बल १ लाख ४३ हजार रुपये किंमतीचे १४९८.४ किलोग्रॅम सुर्यफूल तेल आणि ३२ हजार ६०२ रुपये किंमतीचे ३४३,४ किलोग्रॅम सोयाबीन रिफाइंड तेल असे एकूण १ लाख ७५ हजार ६९९ रुपयांचा खाद्यतेल साठा भेसळीच्या संशयाने जप्त करण्यात आला. तसेच संबधित कंपनीला व्यवसाय ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. ही कारवाई अन्न प्रशासन सहआयुक्त अजित मैत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत अन्न सुरक्षा अधिकारी निखिल कुलकर्णी व पथकाने केली.

जुन्या मोंढ्यातील बालाजी ट्रेडिंगवर छापेमारी

अन्न निरिक्षकांनी जुन्या मोंढ्यातील बालाजी ट्रेडिंग कंपनीची रविवारी अचानकपणे तपासणी केली. यात त्यांच्याकडे अन्न व औषधी प्रशासनाचा परवाना नव्हता. उपलब्ध खाद्यतेलाचे बिल, कागदपत्रे नव्हती. मुख्य म्हणजे सुट्टे खाद्यतेल पुर्नवापरसाठी पाच लिटर आणि १५ लिटरच्या डब्यात भरले सुरु होते. हा १ लाख ७५ हजार ६९९ रुपयांचा

सलग तिसऱ्या दिवशी मोठी कारवाई

शुक्रवारी (दि. २०) उस्मानिया कॉलनी येथील कारखान्यावर छापा टाकत नकली मिठाईसह स्किम्ड मिल्क पावडर, रवा, साखर असा तब्बल १२ लाख ८ हजार रुपयांचा साठा जप्त केला होता. शनिवारी (दि.२१) कैलासनगर भागातील मे. जोधपूर मिष्टान्न भांडार येथून नकली बर्फीचा तब्बल 1 लाख 57 हजार 200 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. रविवारी (दि.२२) जु्न्या मोंढ्यातून सुर्यफूल तेल आणि सोयाबीन रिफाइंड खाद्यतेलाचा एकूण १ लाख ७५ हजार ६९९ रुपयांचा साठा जप्त केला.

Back to top button