Beed News : पांढऱ्याचीवाडी येथे वीज पडून चार जनावरांचा जागीच मृत्यू | पुढारी

Beed News : पांढऱ्याचीवाडी येथे वीज पडून चार जनावरांचा जागीच मृत्यू

नेकनूर, पुढारी वृत्तसेवा : बीड तालुक्यातील पांढऱ्याचीवाडी येथे वीज वाऱ्यासह बुधवारी (दि.17) सायंकाळी पाऊस पडला. पांढऱ्याचीवाडी येथील शेतकरी दिलीप शेळके यांनी दोन गायी आणि वासरे शेतातील झाडाला बांधली होती. परिसरात झालेल्या मुसळधार पावसात वीज पडल्याने जनावरांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे दिलीप शेळके यांचे  मोठे नुकसान झाले. नेकनूर येथील अध्यापक विद्यालय परिसरातील विश्वनाथ सातपुते यांचे कुक्कुटपालन शेड तसेच अनेकांच्या घरावरील पत्रे वादळामुळे उडून गेले. याचबरोबर आंब्याच्या बागांना मोठा फटका बसला आहे. (Beed News)

नांदूर फाट्याजवळ असलेल्या पांढऱ्याचीवाडी येथे बुधवारी सायंकाळी पाच वाजता पाऊस चालू असताना शेतकरी दिलीप शेळके  घराच्या पाठीमागे गेले असता त्यांना झाडाखाली बांधलेली जनावरे मृत्युमुखी अवस्थेत दिसली. यावेळी त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. दरम्यान शेळके आणि शेजारील शेतकऱ्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी आणि कृषी अधिकारी, यांना तत्काळ बोलावले. यानंतर त्यांनी ठिकाणचा पंचनामा केला.

आधीच दुष्काळग्रस्त भागात असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यात पावसामुळे  जवळपास दोन  ते अडीच लाखापर्यंत  नुकसान झाले आहे. नेकनूर परिसरात आंबे, कुकुट पालन शेड ,कडब्याच्या गंजी यांचे मोठे नुकसान झाले आहे. तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांच्याकडून करण्यात आली आहे. (Beed News)

हेही वाचा :

Back to top button